MVA Vs CPI Sarkarnama
महाराष्ट्र

MVA Vs CPI : भालचंद्र कांगो यांनी 'MVA'ला ठणकावले; सन्मान मिळणार आहे का?

CPI Bhalchandra Kongo: महाविकास आघाडीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सन्मान मिळणार आहे का? असा प्रश्न करl भालचंद्र कांगो यांनी कायकर्ते तयारीत आहेत, असा सूचक इशारा दिला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाविकास आघाडीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी जागा वाटपावर ठणकावून विचार आहे की, सन्मान मिळणार आहे की नाही?

"भाजपचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र जरी आलो असलो, तरी आमचा देखील सन्मान होणे गरजेचा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी CPI पक्षाला कमीत कमी 6 जागा सोडाव्यात", असेही भालचंद्र कांगो यांनी म्हटलं आहे.

महाविकास (MVA) आघाडीच्या जागा वाटपाचा काही दिवसांपासून वाढलेला तिढा आज सायंकाळी सुटणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर निर्णायक भूमिका मांडली.

भालचंद्र कांगो म्हणाले, "राज्यात महाविकास आघाडीत मित्रपक्षांना योग्य सन्मान द्यायला हवा. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं नाही. तुम्ही राज्यात INDIA आघाडी म्हणून की महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहात ते ठरवा:. भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी आपण एकत्र जरी आलो असलो तरी आमचा देखील सन्मान होणे गरजेचा आहे, याकडे कांगो यांनी लक्ष वेधले.

विधानसभा निवडणुकीसाठी CPI पक्षाला कमीत कमी 6 जागा सोडावेत. यासंदर्भातील यादी देखील महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांकडे दिली आहे. वणी, छत्रपती संभाजीनगरमधील मध्य, हिंगणा, शिरपूर, सायन कोळीवाडा आणि शेवगाव-पाथर्डी हे सहा मतदार संघ आम्हाला सोडण्यात यावेत. जर त्या जागा सोडल्या नाहीत, तर आम्हाला स्वतंत्र निवडणूक लढवावी लागेल, असा इशारा भालचंद्र कांगो यांनी दिला.

आम्ही लोकसभेला तुमच्या सोबत राहिलो, आता आमचा योग्य सन्मान करा. महाविकास आघाडीने विचार न केल्यास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्या त्या मतदार संघात तयारी करायला सांगितली आहे, असेही CPI पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांची सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT