Sanjay Raut: शिवसेनेचे शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला; उमेदवारीसाठी योगेश घोलप यांचा धरला आग्रह!

Shiv Sena UBT Delegation Meets Sharad Pawar: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी संजय राऊत यांनाही भेटले, जागा मिळत नसेल तर उमेदवार देण्याचा आग्रह
Laxman Mandale, Sharad Pawar & Yogesh Gholap
Laxman Mandale, Sharad Pawar & Yogesh GholapSarkarnama
Published on
Updated on

Maha Vikas Aghadi News: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत घोषणा होत नसल्याने सतत सस्पेन्स अद्यापही वाढत आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत सतत नव्या चर्चा अन् अफवा जन्म घेतात. देवळाली मतदारसंघातही त्याची पुनरावृत्ती होत आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात देवळाली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार निश्चित करण्याची संपूर्ण प्रक्रीया पार पाडली आहे. उमेदवार जाहीर करण्याची औपचारीकताच शिल्लक आहे.

या मतदारसंघात इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांची बैठक मंगळवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या कार्यालयात झाली. यावेळी नाशिकचे प्रमुक पदाधिकारी आणि पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित होते.

मुंबईत झालेल्या या बैठकीत नेत्यांनी इच्छुकांचा कल जाणून घेतला. एकंदर उमेदवारांत लक्ष्मण मंडाले यांचे नाव आघाडीवर असल्याचे कळते. यावेळी उमेदवारी कोणालाही द्यावी. त्याचा निर्णय पक्षाने घ्यावा. सर्व इच्छूक उमेदवार एकत्रितपणे त्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करतील, अशी ग्वाही देण्यात आली.

Laxman Mandale, Sharad Pawar & Yogesh Gholap
Shivsena UBT : 137 कोटी थकवले, आयकर विभागाची नोटीस; शिवसेना'UBT'चे आमदार संतापले

मुंबईमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. त्याच वेळेस मतदारसंघात मात्र स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता कायम आहे. शिवसेना ठाकरे पक्षाने या मतदारसंघाची मागणी केली होती. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रांनुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला आहे.

आता शेवटच्या क्षणी उमेदवार कोण? यासाठी प्रयत्न होत आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार योगेश घोलप आणि जिल्हा उपप्रमुख केशव पोरजे यांसह विविध पदाधिकारी आज सकाळी मुंबईत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना भेटले.

यावेळी त्यांनी मतदारसंघ सोडला जात नसेल तर, एक प्रभावी उमेदवार म्हणून माजी आमदार घोलप यांचा विचार व्हावा, असा आग्रह धरला. खासदार राऊत यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यास सांगितले आहे.

Laxman Mandale, Sharad Pawar & Yogesh Gholap
Devyani Pharande Politics: भाजपकडे आमदार फरांदे यांना कोणता पर्याय; काँग्रेस इच्छुक संपर्कात असल्याची चर्चा!

त्यानुसार आज दुपारी शरद पवार यांच्याशी या शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षामध्ये मात्र अस्वस्थता वाढली. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांत त्याचा नकारात्मक संदेश गेला. मात्र वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना याबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर नेत्यांनी बंडाचे अस्त्र म्यान केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर आता घोषणा लाबत असल्याने या संदर्भात प्रचंड दबाव वाढत आहे. अनेक इच्छुक उमेदवार अन्य पक्षातून तुतारी हाती घेण्यास तयार आहेत. मात्र त्यामुळे पक्षाचे निष्ठावंत इच्छुक नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयात उमेदवारांच्या संख्येला आता मर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे शिष्टमंडळ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यालयात दाखल झाले आहे. देवळाली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. त्यांच्याकडे प्रभावी उमेदवार नसल्यास माजी आमदार योगेश घोलप यांचा विचार करावा. श्री. घोलप यांचा मतदारसंघात मोठा संपर्क आहे. त्याचा विचार करावा, असा आग्रह हे शिष्टमंडळ करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com