Dadar Rail Station Sarkarnama
महाराष्ट्र

Chaityabhoomi : दादर रेल्वे स्टेशनला ‘चैत्यभूमी’ नाव नाही! मेट्रो स्टेशनचे नामांतर, अधिवेशनात होणार कार्यवाही

Dadar Metro Station Name Change Proposal: चैत्यभूमी आणि परिसरात शांततापूर्ण, शिस्तबद्ध व श्रद्धापूर्वक वातावरण कायम राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे,असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

Roshan More

Devendra Fadnavis News : दादर रेल्वे स्टेशनचे नामांतर करून 'चैत्यभूमी' नाव देण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर या चर्चा सुरू होत्या. दरम्यान रेल्वेस्टेशनला नाही तर मेट्रो स्टेशनला 'चैत्यभूमी' नाव देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना त्रास होऊ नये, यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलनांना अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चैत्यभूमी आणि परिसरात शांततापूर्ण, शिस्तबद्ध व श्रद्धापूर्वक वातावरण कायम राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनात ऑटोरिक्षांना प्रवेशाची मर्यादा, भाविकांच्या पुढील प्रवासाची सुविधा आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी पूर्वनियोजित व्यवस्था असावी. रेल्वे, रस्ते वाहतूक, स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलीस यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून अनुयायांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

दादरच्या नामांतरला विरोध

बुधवारी दादरचे, रेल्वे स्टेशनचे नामांतर होणार अशा चर्चा होत्या. त्यावेळी मनसेच्या स्थानिक आमदार यशवंत किल्लेदार यांनी याला विरोध केला होता. तर, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी देखील म्हटले होते की, दादरचे नाव बदलू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे. चैत्यभूमीचे देखील एक वैभव आहे, बाबासाहेबांचे मोठं स्मारक आहे, त्याला आम्ही आदरांजली नेहमी वाहत असतो. शुभकार्य असेल तर आम्ही चैत्यभूमीवर जातो. चैत्यभूमी आणि दादर हे काही वेगळे नाहीये, एकच आहे. हा वाद राज्यकर्ते लावून देतायेत. राज्यकर्त्यांनी हा वाद लावून देऊ नये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT