

Nashik News: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर टीका करतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप केला जात आहे. इतकंच नव्हे तर या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याचवरुन आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. याचेच तीव्र पडसाद नाशिकमध्येही उलटले असून मनसेनं आक्रमक पवित्रा घेत शिंदेंच्या शिवसेनेवर तोंडसुख घेतलं आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या "Belonging: A journey of Love" पुस्तकाविरोधात शिवसेना एकनाथ शिंदे यांनी केलेले आंदोलन आता त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या आंदोलनात शायना एनसी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. त्यावर महाराष्ट्र भर संतप्त प्रतिक्रिया उमटले आहेत.
यासंदर्भात नाशिक शहरात मनसे पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहर कार्यालयाबाहेर आंदोलन करत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष विरोधात घोषणा देण्यात आल्या. या संदर्भात तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाने माफी न मागितल्यास धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला.
शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनातील घोषणांमुळे परिसर दणाणून गेला. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने श्रीमती सोनिया गांधी यांच्या पुस्तका संदर्भात केलेल्या कृतीचा शिवसेनाप्रमुखांची काहीही संबंध नसताना त्यांचा फोटो का फाडला असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुळात दिल्लीकरांना खुश करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. त्यामुळेच त्यांनी मराठी माणसाची अस्मिता गहाण ठेवली आहे. शायना एनसी, संजय निरुपम, शितल म्हात्रे हे बांडगूळ असलेली मंडळी स्वार्थासाठी काहीही करायला तयार असते.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकासंदर्भात घेतलेला पत्रकार परिषदेत शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचा कोणताही संबंध नाही. असे असताना त्यांचा फोटो तेथे उलटा का ठेवण्यात आला. फोटो शायनिंग यांनी जाणीवपूर्वक फाडला आहे. संदर्भात पत्रकार परिषद घेणाऱ्या सर्व नेत्यांवर पक्षाने कारवाई करून त्यांना हकलावे. या नेत्यांना हाकल्ले नाही तर मनसे आपल्या स्टाईलने धडा शिकवेल असा इशारा यावेळी राज ठाकरे यांच्या समर्थकांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.