Jamkhed News : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे 35 वर्षीय दिपाली गोकुळ पाटील यांनी साई लाॅजवर गळफास घेत आत्महत्या केली. कला केंद्रात नर्तिकी असलेल्या दिपाली यांच्या आत्महत्येचे राजकीय कनेक्शन समोर आले आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? असे प्रश्न उपस्थित केले होते.
दरम्यान, या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांचे नाव समोर आले आहे. संदीप हे लग्नासाठी दिपालीवर दबाव टाकत होते. त्यामुळे मागील काही काळापासून ती मानसिक तणावात होती. दबावातून तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात संदिप गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित पवार यांनी मागणी केली होती की, 'सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.'
दिपाली जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती. तिने बाजारात जाऊन येते असे सांगत घरातून बाहेर पडली. मात्र, अनेक तासाने ती परत आली नाही म्हणून तिचा शोध सुरू करण्यात आला. ज्या रिक्षाने ती गेली होती. त्या रिक्षाचालकाकडे चौकशी केली असता तिने त्याने दिपाली यांना साई लाॅजवर सोडल्याचे सांगितले. तेथे जाऊन चौकशी केली असता ज्या रुममध्ये दिपाली थांबली होती तो आतून लाॅक होता. डुप्लिकेट चावीने रुम उघडली असता पंख्याला गळफास घेतलेल्या दिपालीचा मृतदेह आढळून आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.