AJit Pawar dance video : लाडक्या लेकाच्या लग्नात अजितदादांचा भन्नाट डान्स : व्हिडीओ पाहिलात का?

Ajit dada viral dance News : या विवाह सोहळ्याचा वरातीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे भन्नाट असा डान्स करताना दिसत आहेत.
Ajit pawar dance
Ajit pawar dance Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा विवाहसोहळा बहरीन येथे पार पडत आहे. या विवाह सोहळ्याचा वरातीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे भन्नाट असा डान्स करताना दिसत आहेत. सैराट चित्रपटातील प्रसिद्ध अशा झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर अजित दादांनी ठेका धरला असून त्यांची सुहास्य मुद्राही दिसत आहे. या वरातीमध्ये पवार कुटुंबातील अनेक सदस्य दिसत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघे 5 डिसेंबर रोजी विवाहबांधनात अडकले. 4 ते 7 डिसेंबर या दरम्यान हा स्पेशल सोहळा बहरीन येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 400 पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचे नातू, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचं थाटामाटात लग्न झाले. त्यानंतर आता त्यांच्या दुसऱ्या नातवाचा विवाह 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत बहरीन येथे हा विवाह सोहळा होत आहे.

Ajit pawar dance
ShivSena UBT : खैरेंच्या कट्टर शत्रूची अंबादास दानवेंनी घेतली भेट, पक्षप्रवेशाच्याही चर्चा : ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा वादळ

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या सुपुत्राचा हा शाही विवाहसोहळा असून त्यातील वरातीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या वरातीमध्ये पवार कुटुंबातील अनेक सदस्य दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Ajit pawar dance
BJP Mission : भाजपकडून मिशन 2029ची तयारी; निवडणुकांमध्ये 'नंबर वन'चा पक्ष ठरण्यासाठी आखली आक्रमक रणनीती

अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहल सोहळा बहरीनमध्ये पार पडत आहे. काल ( 4 डिसेंबर) मेहंदी सोहळा झाला. तर आज ( 5 डिसेंबर) हळद, मेहंदी आणि मुख्य विवाह सोहळा पार पडत आहे. 7 डिसेंबर रोजी स्वागत समारंभ आणि रिसेप्शन होणार आहे. परदेशात होणाऱ्या या सोहळ्याला पवार कुटुंबातील काही सदस्य गेले, पण अनेक जण अनुपस्थित आहेत.

Ajit pawar dance
Congress News : मोदींचं भाकित खरं ठरणार; काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, बड्या नेत्याच्या लेकानं थेट नव्या पक्षाचं नावच सांगितलं...

या महत्त्वाच्या सोहळ्याला केवळ मोजक्या 400 पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आलं असून राष्ट्रवादीतून तर फक्त दोनच नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.हा विवाह सोहळा शुक्रवारी पार पडला. राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नाचे काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. जय पवार यांच्या वरातीचे ते फोटो असून त्यात पवार कुटुंबातील अनेक सदस्य दिसत आहेत.

Ajit pawar dance
NCP Sharad Pawar : पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 'नो इंटरेस्ट'; 'तुतारी'वाला माणूस मतपत्रिकेवरून गायब?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com