Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : दरे गावातून एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, 'माझा निर्णय मी घेतलाय...'

Eknath Shinde BJP Narendra Modi Amit amit shah : पाच तारखेला शपथविधी होणार आहे. त्यामुळे भाजपची उद्या बैठक आहे त्यामध्ये मुख्यमंत्री निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Roshan More

Eknath Shinde News : अमित शाह यांच्या भेटीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत परतल्यानंतर थेट आपले साताऱ्यातील दरे गाव गाठले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. नवीन सरकारच्या शपथविधीच्या हालचाली सुरू असताना शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज (रविवारी) दरे गावातून मुंबईला निघताना शिंदेंनी मीडियाशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे म्हणाले,'निकालानंतर संभ्रम नको म्हणून आदरणीय मोदीजी, गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा असेल. माझा पूर्ण पाठींबा असेल मी आधीच जाहीर केले होते. माझा निर्णय मी घेतलाय.'

मी मुख्यमंत्री नाही तर काॅमन मॅन म्हणून काम केले. लोकांच्या अडचणी समजून घेतल काम केलं. त्यामुळे लोक म्हणायला लागले हे आपलं सरकार आहे. आम्ही ज्या कल्याणकारी योजना राबवल्या त्याचे प्रतिबंध निवडणूकीत पाहण्यास मिळाले. कुठल्याही पक्षाला आत्तापर्यंत येवढे भव्य यश मिळाले नाही. तेवढे यश आम्हाला मिळालेय, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

गृहमंत्रिपदावर बैठकीत निर्णय होणार

गृहमंत्री पद मिळण्याबाबत पत्रकारांनी शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, अमित शाह यांच्यासोबत एक बैठक झाली आहे. आत्ता आम्ही तिघे बैठक घेऊ. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येतील. पाच तारखेला शपथविधी होणार आहे. त्यामुळे भाजपची उद्या बैठक आहे त्यामध्ये मुख्यमंत्री निश्चित होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT