Central government employees DA hike 2026 Sarkarnama
महाराष्ट्र

DA increase : महागाई भत्ता वाढल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना बंपर फायदा; 3 महिन्यांच्या एरियरसह मिळणार 'इतकी' रक्कम!

DA increase latest news India government staff: महागाई भत्ता वाढल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. 3 महिन्यांच्या एरियरसह पगारात किती वाढ होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती.

Rashmi Mane

Salary hike after DA increase India government staff: केंद्र सरकारने अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला होता. महागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्यात आली असून यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. या निर्णयानुसार महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवण्यात आला असून आता तो एकूण 60 टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठा आधार मानला जात आहे.

या वाढीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा थकबाकी रक्कम एकत्र मिळणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीतील महागाई भत्त्याचा फरक एरियर स्वरूपात दिला जाणार आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या भत्त्यात दरमहा 1000 रुपयांची वाढ झाली असेल, तर त्याला एकाच वेळी 3000 रुपये अतिरिक्त मिळतील. त्यामुळे एप्रिलच्या पगारातच ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

सरकार साधारणपणे वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात बदल करते. मात्र यावेळी जानेवारीपासून लागू होणारा भत्ता एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आला. त्यामुळे तीन महिन्यांची थकबाकी एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना एकाच वेळी जास्त रक्कम मिळून आर्थिक दिलासा मिळणार आहे.

पगारानुसार किती फायदा होणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. ज्यांचा मूळ पगार 18000 रुपये आहे, त्यांना सुमारे 360 रुपयांची वाढ मिळेल. 25000 रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना सुमारे 500 रुपये अधिक मिळतील. 36500 रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 730 रुपयांची वाढ होईल.

याशिवाय, 50000 रुपये बेसिक सॅलरी असणाऱ्यांना 1000 रुपये, 75000 रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना 2000 रुपये आणि 150000 रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांना सुमारे 3000 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्तरातील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे.

एकूणच, महागाई भत्ता वाढ आणि एरियर मिळाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त पैसे येणार असून त्यांच्या खर्च भागवण्यात मोठी मदत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT