Sanjay Raut Sarkaranama
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : राऊत म्हणतात 'त्यांना' चपलेने मारा!

Pradeep Pendhare

Mumbai News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सिंधुदुर्गमध्ये कोसळल्याच्या घटनेवर संजय राऊत चांगलेच भडकले. शिवसेना नेते मंत्री दीपक केसरकर यांनी केलेले विधानावर, त्यांना चपलेने मारले पाहिजे आणि लोक मारणार, अफजलखानाची अवलाद आहे.

"मिंधे यांनी पोसलेली ही अशी माणसं आहे, ही या मिंधे त्यंच्य मंत्रिमंडळात आहेत, बरं झालं ही घाण आमच्याकडून केली", अशा भाषेत संजय राऊत यांनी मंत्री केसरकर यांच्यावर हल्ला चढवला.

संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, हे बरं झालं? कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात? असा सवाल केला. हा शुभ शकुन आहे, काहीतरी चांगलं घडेल किती घाणेरड्या मनोवृत्तीची माणसं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निर्माण केली आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांचे हे पाप आहे, हे का शिवाजी महाराजांचे शत्रू झाले मला कळत नाही. मिंधे आणि त्यांच्या टोळी पोसण्याचा काम फडणवीस यांनी केलं, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाडला. पैसे खाण्यासाठी हा आरोप नाही सत्य आहे, असा देखील दावा संजय राऊत यांनी केला.

वाऱ्याने पुतळा पडला, पण त्याच वाऱ्याने किल्ल्याच्या बाजूचे झाड, लोकांच्या घरावरील पत्रे असे का उडाले नाहीत. वादळात लोकांचे नुकसान झाले नाही. पण फक्त पुतळा पडला, याचा अर्थ पुतळा भ्रष्टाचाराने पोखरलेला, चौथरा कोट्यवधी रुपये खाल्ले आणि आता ज्या बातम्या समोर येत आहेत. ठाणे कनेक्शन आणि मुख्यमंत्र्यांच्या पुत्र्याचा कनेक्शनच्या या बातम्या समोर आहेत, त्याच्या वरती खरं म्हणजे विद्यमान न्यायमूर्ती यांच्या एक विशेष पथक (SIT) स्थापन केली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे सरकार भ्रष्टाचार करत आणि पैसे खात आहे. या पैशातून परत तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणुका लढणार, या घटनेचा फक्त निषेध करायचा का? थंड बसायचं, शंडासारखं, असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT