Supreme Court Shiv Sena case Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena news : आता उद्धव ठाकरेंच्या बॉम्बचा प्रतिकार सहा खासदार कसा करणार? असीम सरोदे यांचे अपात्रतेबाबत सूचक विधान

Uddhav Thackeray, Asim Sarode, Shiv Sena UBT, Eknath Shinde, Six Shinde Sena MPs : खासदारांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने बजावलेला व्हीप पाळला नाही, पक्षाच्या निर्णयानुसार वागले नाहीत तर ते खासदार अपात्र ठरतील, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

Rajanand More

Delimitation Controversy : संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये सोमवारी परिसीमन विधेयक सादर केले जाणार आहे. या विधेयकावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटत आहेत. याअनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या सहा खासदारांबाबत उद्धव ठाकरेंचे वकील असीम सरोदे यांनी महत्वाचे विधान केले आहे.

असीम सरोदे यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. मूळ शिवसेनेतून पळून गेलेले सहा खासदार आता उद्धव ठाकरेंच्या परिच्छेद 2(1)b च्या बॉम्ब चा प्रतिकार कसा करणार?, असा प्रश्न उपस्थित करत सरोदे यांनी यांनी म्हटले आहे की, शिवसेनेतून मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 खासदार आर्थिक फायद्यासाठी शिंदेसेनेत जाऊन मिळाले. कोणतीही प्रक्रिया न पाळता भाजपचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्या सहा फुटीर खासदारांना मान्यता देऊन वेगळी बसण्याची व्यवस्था करून दिली.

10 व्या परिशिष्टातील परिच्छेद 2 (1) a

'या सहा खासदारांवर 10 व्या परिशिष्टाच्या परिच्छेद 2 (1) a नुसार स्वतःच्या वागणुकीतून पक्षविरोधी वागणूक केल्याने अपात्रतेची कारवाई सुरू आहे. या सहापैकी कुणालाही उद्धव साहेबांनी पक्षातून काढून टाकलेले नाही. त्यामुळे ते खासदार तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचा भाग आहेत, असे सरोदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

10 व्या परिशिष्टातील परिच्छेद 2 (1) b

सहा खासदारांनी डिलिमिटेशन बिलाच्या विरोधात मतदान करावे, अशी स्पष्ट सूचना देणारा राजकीय पक्ष शिवसेनेचा व्हीप त्यांना बजावण्यात आला आहे. आता त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेणे आणि डिलिमिटेशन बिलाच्या बाजूने संसदेत मतदान करणे म्हणजे ते परिच्छेद 2(1)b नुसार अपात्र ठरतील, असे सरोदे यांनी नमूद केले आहे.

खासदारांनी व्हीप पाळला नाही, पक्षाच्या निर्णयानुसार वागले नाहीत तर ते खासदार अपात्र ठरतील. पक्षाने त्यांना अजूनही निलंबित केलेले नाही. ते आजही उद्धव ठाकरे यांचे खासदार आहेत. म्हणून त्यांना ठाकरे यांच्या पक्षाचा व्हीप पाळणे बंधनकारक आहे, असा दावा सरोदे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT