माजी आमदार आणि खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनवरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.
राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण लक्षात घेता ही पेन्शन बंद करण्याची मागणी होत आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक माजी लोकप्रतिनिधींना मोठ्या रकमेची पेन्शन मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.
Maharashtra political news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-अमेरिका युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे लागेल, असे आवाहन केले. पुढील वर्षभर घरात कोणताही कार्यक्रम असो, लग्नासाठीही सोने खरेदी करू नका, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करा, पेट्रोल-डिझेलचा संयमाने वापर करण्याबरोबरच खाद्य तेलाच्या वापरावर देखील त्यांनी भाष्य केले. तर हे सर्व आवाहन त्यांनी परदेशी चलन वाचविण्यासाठी केले.
यानंतर आता विरोधकांसह सर्वसामान्य जनता पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर टीका करताना दिसत आहेत. सगळे निर्बंध सर्वसामान्य लोकांवरच का? असा सवाल विचारत जनता राज्यकर्त्यांना मिळणाऱ्या सुविधांवर बोलताना दिसत आहे. आमदार आणि खासदारांना मिळणाऱ्या मानधन त्यांच्या पेन्शनवर भाष्य करताना दिसत आहेत. निवृत्त झालेल्या लोकप्रतिनिधींची स्थिती चांगली असताना राज्याच्या तिजोरीने शेकडो कोटी रुपयांचा ताण कशासाठी सहन करायचा? असे म्हणत ही पेन्शन बंद करण्याची मागणी होत आहे.
राज्यात असे काही माजी आमदार किंवा माजी खासदार जे सध्या विधानपरिषदेचे आमदार किंवा खासदार म्हणून काम करत आहेत. तरीही त्यांना पेन्शन लागू आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यांना विधानसभेच्या माजी आमदार म्हणून महिन्याकाठी 84 हजार रुपयांची पेन्शन मिळते. याशिवाय संसदेच्या माजी सदस्या, माजी राष्ट्रपती म्हणूनही त्यांना विविध सोईसुविधा मिळतात.
महाराष्ट्रात माजी आमदारांना दरमहा ५०,००० रुपयांची पेन्शन (एक टर्म) दिली जाते, ज्यामध्ये एकापेक्षा अधिक टर्म असल्यास प्रति वर्ष ₹२,००० वाढ होते. ही पेन्शन पहिल्या टर्मनंतर लगेच सुरू होते आणि मृत आमदारांच्या पत्नीलाही पेन्शनचा लाभ मिळतो. राज्यात सध्या सुमारे ६३० माजी आमदारांना किंवा त्यांच्या पत्नीला पेन्शन आहे. यामध्ये ५० हजारांपासून एक लाख 16 हजारांपर्यंत पेन्शन घेणारे माजी आमदार असल्याची माहिती आता महाराष्ट्र विधी मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर (https://mls.org.in/docformember/EX-MLA.pdf) आहे. यामध्ये १ लाखांच्या वर पेन्शनधारक माजी आमदारांची संख्या १४ आहे. तर ९० हजारांपर्यंत पेन्श्न घेणारे माजी आमदार ९ आहेत.
तसेच आमदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला कुटुंब पेन्शन म्हणून दरमहा ₹४०,००० पेन्शन मिळत होती. पण 2016 मध्ये निवृत्ती वेतन 10 हजार रुपयांनी वाढवण्यात आलं. इतर सुविधांमध्ये माजी आमदारांना मोफत रेल्वे पास आणि वैद्यकीय सुविधा दिली जाते. दरम्यान आता पेन्शनमध्ये २० हजारांची वाढ करण्याचा प्रस्ताव (एकूण ७० हजार करण्याची मागणी) सरकारकडे विचाराधीन असल्याची माहिती आहे.
यापैकी सर्वाधिक निवृत्ती वेतन घेणारे आमदारांची नावे पुढील प्रमाणे...
सुरूपसिंग हिऱ्या नाईक (नंदुरबार) १ लाख 16 हजार
जीवा पांडु गावित (नाशिक) १ लाख १० हजार
पद्मसिंह बाजीराव पाटील (मुंबई) १ लाख १० हजार
के.सी पाडवी (नंदुरबार) १ लाख १० हजार
मधुकरराव काशिनाथ पिचड (अहिल्यानगर) १ लाख १० हजार
बबनराव भिकाजी पाचपुते (अहिल्यानगर) १ लाख ०८ हजार
सुरेश कुमार भिकमचंद जैन (जळगाव) १ लाख ०८ हजार
दादा जाधवराव (पुणे) १ लाख ०२ हजार
विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील (सोलापूर) १ लाख ०२ हजार
अनंतराव नारायण थोपटे (पुणे) १ लाख
हितेंद्र विष्णू ठाकूर (पालघर) १ लाख
प्रकाश मंजुबाई मेहता (मुंबई) १ लाख
बबनराव विठ्ठलराव शिंदे (सोलापूर) १ लाख
बाळासाहेब भाऊसाहेब थोरात (मुंबई) १ लाख
९० हजारांच्या वर निवृत्ती वेतन घेणारे आमदारांची नावे पुढील प्रमाणे...
माणिकराव गोविंदराव ठाकरे (यवतमाळ) ९८ हजार
विक्रम सिंह रणजीत सिंह (पाटणकर) ९४ हजार
अरुण गोवर्धनदास गुजराती (मुंबई) ९२ हजार
श्रीमती शोभा माधवराव फडणवीस (चंद्रपूर) ९२ हजार
लक्ष्मणराव कोंडीबा ढोबळे (सोलापूर) ९० हजार
सतीश भाऊलाल चतुर्वेदी (नागपूर) ९० हजार
शिवाजीराव शिवरामजी मोघे (यवतमाळ) ९० हजार
प्रकाश कल्लाप्पाण्णा आवाडे (कोल्हापूर) ९० हजार
मधुकरराव देवराव चव्हाण (धाराशिव) ९० हजार
माजी आमदार आणि खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनवरून राज्यात चर्चा सुरू आहे.
राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत असल्याने पेन्शन बंद करण्याची मागणी होत आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नावाचाही उल्लेख झाला आहे.
काही माजी आमदार आणि खासदार सध्या विधानपरिषद किंवा संसदेत कार्यरत आहेत.
१ लाख रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे १४ माजी आमदार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.