

Ahilyanagar News: अहिल्यानगर महापालिकेतील नगरसेवक श्रीपाद छिंदम याने काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या घटनेनंतर त्यांच्याविरोधात राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली होती. यानंतर नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत छिंदमनं विजय मिळवला होता. पण अर्थसंकल्पीय सभेत छिंदम बोलण्याकरिता उभा राहिला असताना प्रचंड गोंधळ निर्माण झाला. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यासमोरील माईकची हिसकावून घेतला. तसेच छिंदमलाही सभागृहाच्या बाहेर हुसकावलं. यामुळे अहिल्यानगर पालिकेत तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.
अहिल्यानगर महानगरपालिकेची शुक्रवारी(ता.27) झालेली अर्थसंकल्पीय प्रचंड वादळी ठरली. या सभेत काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य केलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्याविरूद्धचा अहिल्यानगरकरांच्या मनातला राग पुन्हा एकदा बाहेर आल्याचं दिसून आलं.
श्रीपाद छिंदम हा नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदम सभागृहात बोलण्यासाठी उभा राहताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. त्यानंतर सभेतील वातावरण चांगलंच तापलं.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभा सुरू असताना छिंदम याला सभागृहाबाहेर काढण्याची मागणी नगरसेवकांनी महापौरांकडे ज्योती गाडे यांच्याकडे केली. इतकंच नव्हे, तर काही नगरसेवकांनी छिंदम याच्या आसनाजवळ जाऊन घेराव घालत त्याला बाहेर जाण्यास सांगितले.त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचंही पाहायला मिळालं.
उपमहापौर राहिलेल्या श्रीपाद छिंदम हा भाजपचा नगरसेवक राहिला आहे. पण शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली, त्याच्या पदाचा तातडीनं राजीनामाही घेण्यात आला. त्याचं नगरसेवकपदही रद्द करण्यात आलं. त्यानंतरही दोनवेळी तो पुन्हा निवडून आला आहे. एकदा अपक्ष तर यावेळी तो बहुजन समाज पक्ष (बसप) कडून निवडून आला आहे. त्याने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याने भाष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर नगरसेवकांनी त्याला बोलू दिलं नाही. यामुळे सभागृहात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि अखेर नगरसेवकांचा तीव्र विरोध लक्षात घेता श्रीपाद छिंदमला सभागृहाबाहेर काढण्यात आलं.
महापालिकेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतानाच शिवद्रोही व्यक्तीसोबत आम्ही सभागृहात बसणार नाही. तो यापुढे ज्यावेळी सभागृहात येईल, तेव्हा त्याला बाहेर काढले जाईल, असा त्याच्याविरूद्ध ठराव करण्यात यावा. त्याला सभागृहात बसू दिले तर आम्ही सभात्याग करू अशी ठाम भूमिकाही नगरसेवकांनी यावेळी मांडली.
जुन्या वादग्रस्त घटनेचा डाग पुसण्यासाठी श्रीपाद छिंदम याने यावर्षी शिवजयंती साजरी करून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला होता. पण फलकावरून नाव काढल्यानंतर या वादावर पडदा पडल्याचे समोर आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.