Professor Recruitment Cancellation Selection Grade CAS Sarkarnama
महाराष्ट्र

Professor Recruitment 2026: प्राध्यापकांसाठी गुड न्यूज! भरती प्रक्रिया पद्धतीत बदल; अडचणीची ठरणारी मोठी अट रद्द

Professor Recruitment Cancellation Selection Grade CAS: पात्र प्राध्यापकांना 'वरिष्ठ श्रेणी' मिळाल्यानंतर ५ वर्षांनी थेट 'निवड श्रेणी'साठी पात्र मानले जाणार आहे. ज्यांनी यापूर्वी उशिरा पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यामुळे त्यांना नंतरच्या तारखेपासून लाभ मिळाला होता, त्यांच्या लाभ देण्याच्या दिनांकात आता सुधारणा करण्यात येणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Assistant Professor CAS issue: राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून सुधारित कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, निष्पक्षता आणि संतुलन असावे, यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून नवा अध्यादेश काढला आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संस्थांमधील प्राध्यापकांना 'करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम' (CAS) अंतर्गत मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी नवा अध्यादेश काढला आहे.

प्रामुख्याने ज्या प्राध्यापकांची नियुक्ती १ जानेवारी १९९६ नंतर आणि २७ फेब्रुवारी २००३ पूर्वी झाली आहे, त्यांना 'निवड श्रेणी' मिळवण्यासाठी आता पदव्युत्तर पदवी घेण्याची अट रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी अशा प्राध्यापकांना उच्च शैक्षणिक अर्हतेच्या अटीमुळे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मिळण्यास अडचणी येत होत्या, परंतु तत्कालीन सेवाप्रवेश नियमांचा विचार करून सरकारनेही अट शिथिल करण्यात आली आहे.

नव्या निर्णयानुसार अशा पात्र प्राध्यापकांना 'वरिष्ठ श्रेणी' मिळाल्यानंतर ५ वर्षांनी थेट 'निवड श्रेणी'साठी पात्र मानले जाणार आहे. ज्यांनी यापूर्वी उशिरा पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यामुळे त्यांना नंतरच्या तारखेपासून लाभ मिळाला होता, त्यांच्या लाभ देण्याच्या दिनांकात आता सुधारणा करण्यात येणार आहे.

पात्र शिक्षकांना या सुधारित दिनांकापासून लागू होणारी वेतनातील फरकाची रक्कम तात्काळ देण्यात यावी, असा आदेश देण्यात आला आहे. हा निर्णय कायमस्वरूपी अध्यापकांसोबतच २७ फेब्रुवारी २००३ पूर्वी अस्थायी किंवा हंगामी स्वरूपात नियुक्त होऊन नंतर नियमित झालेल्या अध्यापकांनाही लागू राहणार असल्याचे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.

या नव्या कार्यपद्धतीनुसार सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक या तिन्ही पदांसाठी एकात्मिक मूल्यमापन प्रणाली लागू असेल. यात उमेदवारांच्या शैक्षणिक आणि संशोधन गुणवत्तेला ६० टक्के, अध्यापन कौशल्य मूल्यमापनाला २० टक्के आणि मुलाखत कामगिरीला २० टक्के देऊन अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. 6 ऑक्टोबर 2025 रोजीच्या सरकार निर्णयातील तरतुदी रद्द करून परिशिष्ट-अ मधील नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT