Dhule Crime: साखरपुडा सोहळ्यात रंगला मृत्यूचा थरार! मोबाईलचं स्टेटस् ठरलं तीन जणांच्या हत्येचं कारण

Dhule triple murder at engagement ceremony in Pimpalner:सोशल मीडियावरील स्टेटसमुळे हा वाद टोकाला गेला. यातील अनिल गोसावी याने सोशल मीडियावर चिथावणी टाकणारे स्टेटस ठेवले होते. त्या स्टेटस मुळे दोन गटांमध्ये असलेल्या वादाला चिथावणी मिळाली.
Dhule triple murder at engagement ceremony
Three Murdered During Engagement Ceremony in PimpalnerSarkarnama
Published on
Updated on

Dhule Crime Case: सामाजिक नेतृत्वावरून पेटलेल्या वाद हत्येपर्यंत पोहोचला. पिंपळनेर येथे साखरपुड्यातच घडलेल्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेने समाजातही शोक पसरला. समाजाचे नेतृत्व कोणी करावे यावरून झालेला वाद हत्येला कारणीभूत ठरला आहे. पिंपळनेर येथे साखरपुडा सुरू असताना ही घटना घडली. त्यामुळे साखरपुड्यात एकच धावपळ उडाली.

सोशल मीडियावरील स्टेटसमुळे हा वाद टोकाला गेला. यातील अनिल गोसावी याने सोशल मीडियावर चिथावणी टाकणारे स्टेटस ठेवले होते. त्या स्टेटस मुळे दोन गटांमध्ये असलेल्या वादाला चिथावणी मिळाली.

पिंपळनेर (साक्री) येथे मगनगीर गोसावी यांच्या घरी साखरपुडा होता. यावेळी समाजात वर्चस्व असलेले सुरेश गिरी, साहिल गिरी हे पिता पुत्र आणि देवेंद्र पवार हे उपस्थित होते. यावेळी गुजरात येथील कांतीलाल उर्फ कन्हैया गोसावी जसवंत गिरी गोसावी महेंद्र गोसावी अनिल गोसावी यांनी हा हल्ला केला.

साखरपुडा सुरू असताना गुजरात येथील हे संशयित आले होते. त्यांनी गिरी कुटुंबीयांना तुम्ही इथेही पुढारपण करायला आले का? असे म्हणत वाद सुरू केला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. इतरांनी मध्यस्थी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

चाकू आणि धारदार शस्त्रांनी झालेल्या अचानक हल्ल्यामुळे सुरेश सुपडुगीर गोसावी आणि शैलेश सुरेश गिरी गोसावी हे पिता पुत्र तसेच देवेंद्र ज्ञानेश्वर पवार हे गतप्राण झाले. पंकज गीत, अशोकगीर गोसावी आणि सागर मोजगीर गोसावी राहणार नंदुरबार हे देखील जखमी झाले. या घटनेनंतर संशयित काळ्या रंगाच्या वाहनातून पसार झाले.

Dhule triple murder at engagement ceremony
MP Ricky Andrew J Syngkon: ज्येष्ठ खासदाराचा मृत्यू! फुटबॉल खेळताना मैदानावरच कोसळले

या संदर्भात पंकजगीर गोसावी यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी गुजरात येथील एका विवाह समारंभात सामाजिक नेतृत्वावरून संबंधितांमध्ये वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी बैठकही घेण्यात आली होती. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. या वादाची परिणीती तिघांच्या हत्येच झाली आहे.

समाजाचे नेतृत्व करण्यावरून दोन गटांमध्ये हा वाद झाला होता. अचानक घडलेल्या या कार्यक्रमाने साखरपुड्याच्या कार्यक्रमातही नागरिकांची पळापळ झाली. याबाबत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेण्यासाठी गुजरात येथे पथक रवाना केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com