Tukaram Birkad & Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Tukaram Birkad : अजितदादांच्या निकटवर्तीय माजी आमदाराचे अपघाती निधन; अकोल्यावर शोककळा

Tukaram Birkad Passes Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अकोल्यात राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

Aslam Shanedivan

Akola News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार तथा वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड यांचे निधन झाले आहे. ते अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे माजी आमदार होते.

बिरकड यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसींनी ताबडतोब कारवाई केली असून धडक देणाऱ्या मालवाहू वाहन ताब्यात घेतलं आहे. तसेच वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आले होते. येथे भाजपचे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित होती. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके देखील उपस्थित होते.

बिरकड हे बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. भेटीनंतर ते मोटारसायकलवरून परत निघाले होते. यावेळी काळाने बिरकड यांच्यावर घाला घातला. मालवाहू वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ज्यात बिरकड यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांच्या सहकाऱ्याचाही मृत्यू झाला.

बिरकड यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ दुर्दैवी अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने स्थानिक खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याचा या अपघात दुर्दैवी मृत्यू झाला.

महाकुंभ मेळ्यात जाणार होते

यंदा प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरला आहे. येथे देशभरातून लाखो भाविक जातायत. बिरकड देखील दोन दिवसांनी सहपरिवार महाकुंभ मेळ्याला जाणार होते. मात्र नियतीने आधीच आपला डाव साधला आणि त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने परिवाराने आक्रोश केला.

अकोल्याच्या राजकीय वर्तुळावर शोककळा

तुकाराम बिरकड यांच्या अपघाती निधनामुळे अकोल्यातील राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. बिरकड यांना ज्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते, त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. तर त्यांच्या परिवाराचे सांतवन केले.

पोलिसांची ताबडतोब कारवाई

माजी आमदार तथा वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड यांच्या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच दुसरे पथक वाहनाच्या शोधात पाठवले होते. पोलिसांनी अपघातातील वाहन जप्त करत चालकासह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT