Ajit Pawar Death in Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर बारामतीत कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी असून, त्यात वाढच होत आहे. बारामतीमधील रुग्णालयाबाहेर, अजित पवार समर्थकांना अश्रूंचा देखील बांध अनावर होताना दिसतो आहे. यात राज्यभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
अजितदादांचे जुने सहकारी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. 'अक्षरशः सुन्न करणारी घटना असल्याचे सांगत, महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच, अशा प्रकारची ही धक्कादायक घटना आहे,' असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर राहिले. अजितदादांच्या निधनावर जयंत पाटील यांनी, "राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे, असेच म्हणावे लागेल. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे जवळपास 35 ते 40 वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते. प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम केले."
'महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच, अशा प्रकारे अजितदादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाही,' असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वाधिक उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता, महाराष्ट्राने कायमचा गमावला आहे. अजित दादांची उणीव कायम भासत राहील, अशी व्यक्त करताना, जयंत पाटील हे भावनिक झाले.
माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले, "अनेक नेत्यांबरोबर काम केलं आहे. परंतु अजितदादा यांच्या कामाची पद्धतच वेगळी होती. त्यांची सकाळी सात वाजल्यापासून कामाला सुरुवात व्हायची, सामान्य माणसांशी, तरुणांशी, वृद्धांशी नाळ जोडलेला नेता म्हणून, त्यांची महाराष्ट्रभर ओळख. यातूनच त्यांची लोकप्रियता होती."
"रोखठोक बोलणारा, जे बोलन ते करणारा, अशी त्यांची कृती होती. ते त्यांच्या कार्यातून सिद्ध देखील केली होती. माझ्या मंत्रिमंडळाच्या कामकाजामध्ये वडील भाऊ म्हणून, त्यांनी नेहमीच पाठबळ दिलं. यातूनच मी राजकारणात झेप घेऊ शकलो,' असे राजेश टोपे यांनी म्हटले.
'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, त्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो, दादांना भेटत होतो, विनंती करत होतो. यातून माझी त्यांच्याशी शेवटची भेट कृषी प्रदर्शनात झाली. त्यांनी ईव्ही कारमध्ये बसून प्रत्येक स्टॉलवर जाऊन कृषी प्रदर्शन दाखवलं. राष्ट्रवादीला कधीच भरून येणार नाही, असे नुकसान झालेला आहे,' अशी भावना राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.