

ShivSenaUBT MP Sanjay Raut : बारामती इथं विमान अपघातात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी निधन झालं. या घटनेनं महाराष्ट्रासह देशात शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या निधनाचं वृत्त समोर येताच, राज्यातील नेत्यांच्या, हजारो कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.
अजितदादांच्या निधनावर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, 'अजितदादांशिवाय राज्याचं राजकारण बेचव आणि आळणी होईल', अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना, "विमान अपघात झाल्याची माहिती कळाली होती. अपघातातून अजित पवार सहीसलामत बाहेर यावं, अशी आम्ही प्रार्थना करत होतो. पण दुर्दैवाने काळ आला. अजितदादांशिवाय महाराष्ट्राचा राजकारण आणि समाजकारण हे खूप बेचव आणि आळणी होईल. त्यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास, रोखठोक कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता, त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे."
'त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या (Maharashtra) मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांचं नातं होतं, त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा, हा विचित्र योगायोग आहे,' अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली.
'श्रद्धांजली त्यांना व्हावा लागेल, असं कधी मनात आलं नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीचा राजकारण केलं, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, ठाकरे यांचे म्हणणे होते की, कॅबिनेटला पूर्ण तयारी करून येणारा नेता, असा ते अजितदादांचा उल्लेख करायचे. राज्याच्या प्रश्नांचा अभ्यास त्यांना विशेषता करून पाटबंधारे, पाणी, याचा अभ्यास पक्का होता. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम होतं,' असे संजय राऊत यांनी सांगितले.
शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आणलं आणि गेल्या दोन अडीच वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राज्यात राजकारणाला सुरुवात केली होती. त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल हे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. अत्यंत कार्यक्षम मंत्री आपण गमावला. त्यांना मिळालेलं प्रत्येक पद हे, त्यांनी राजकारणासाठी वापरलं. याशिवाय कार्यकर्त्यांसाठी, जनतेच्या विकासासाठी देखील वापरलं, असेही संजय राऊत यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.