Neelam Gorhe & Anil Parab Sarkarnama
महाराष्ट्र

Monsoon Session News : आमदार शिरसाट यांच्या विरोधातील परबांची सूचना उपसभापतींनी फेटाळली..

Maharashtra : परवानगी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या परब यांनी सभात्याग केला. यामुळे सभागृहात काही काळ गदारोळ झाला.

सरकारनामा ब्युरो

Mumbai : शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज विधानपरिषदेत देखील उमटले. (Monsoon Session News) आमदार अॅड. अनिल परब यांनी शिरसाट यांच्याविरोधात उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे नियम ३५ अन्वये सूचना दिली होती.

परंतु ज्यांच्या विरोधात ही सूचना देण्यात आली आहे, ते या सभागृहाचे सदस्य नसल्याचे सांगत उपसभापतींनी अनिल परब (Anil Parab) यांना ३५ च्या सूचनेवर बोलण्यास परवानगी नाकारली. ही परवानगी कशाच्या आधारे नाकारण्यात आली याची कारणे देखील (Nilam Gorhe) नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात वाचून दाखवली.

दरम्यान, याचा निषेध व्यक्त करत परब यांनी सभात्याग केला. (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांनी राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याविरोधात नुकतेच वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर शिरसाट यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली. यावर ठाकरे व शिंदे गटाचे मंत्री, आमदार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते.

शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्याविरोधात केलेले वक्तव्य हे महिलांचा अवमान करणारे असल्याचा आरोप करत या विषयावर विधान परिषदेत नियम ३५ च्या सुचनेनूसार चर्चेची परवानगी आमदार अनिल परब यांनी उपसभापतींकडे लेखी मागितली होती. पंरतु संजय शिरसाट यांनी ज्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर आरोप किंवा वक्तव्य केले त्या या सभागृहाच्या सदस्य नाहीत.

त्यांना या संदर्भात दाद मागण्यासाठी स्वतंत्र नियम आणि व्यवस्था आहे. त्यामुळे या सभागृहात त्याबद्दल चर्चा करता येणार नाही, असे उपसभातींनी स्पष्ट करत परबांची सूचना फेटाळली. दरम्यान, परवानगी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या परब यांनी सभात्याग केला. यामुळे सभागृहात काही काळ गदारोळ झाला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT