Devebdra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis first speech : फडणवीसांनी सांगितला पहिल्या भाषणावेळीचा 'तो' किस्सा अन् सभागृहात पिकला एकच हशा !

Political humor Devendra Fadnavis : विद्यार्थी दशेतच स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी भारावलेल्या फडणवीसांची वक्तृत्व शैली अतिशय ओघवती आणि युवकांसाठी प्रेरणादायक राहिली आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात भाषण करीत असतानाही ते चाचपडत होते.

Sachin Waghmare

Pune News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्तृत्व शैली पाहिली तर त्यांचे नेहमीच कौतुक होते. त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची मुलुख मैदानी तोफ असाच परिचय आहे. देवेंद्र फडणवीस विद्यार्थी चळवळीत असतांना सर्व प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. विद्यार्थी दशेतच स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी भारावलेल्या फडणवीसांची वक्तृत्व शैली अतिशय ओघवती आणि युवकांसाठी प्रेरणादायक राहिली आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात भाषण करीत असतानाही ते चाचपडत होते. याची कबुली त्यांनीच देत पहिल्या भाषणावेळीचा संपूर्ण किस्साच त्यांनी सर्वांना सांगितला.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ओळख एक चांगले व्यक्ती, उत्कृष्ट संसदपटू आणि सक्षम मुख्यमंत्री अशी आहे. विरोधी पक्षाचे आमदार असताना फडणवीस यांनी सादर केलेले केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण हा सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळींसाठी सुद्धा आवडीचा आणि औत्सुक्याचा विषय असे. फडणवीसांचे राज्य अर्थसंकल्पाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकण्यासाठी त्या-त्या वेळचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री व अनेक ज्येष्ठ सदस्य आवर्जून विधिमंडळ सभागृहात थांबत.स्व. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विधानसभेतील देवेंद्र फडणवीसांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनंतर खास थांबून त्यांचे अभिनंदन केल्याचे अनेकदा पाहावयास मिळाले. त्यांनी त्यांच्या भाषणातून अनेकांची मनेही जिंकली आहेत.

विद्यार्थी दशेत असताना भाषण करीत असताना मुकुल कानिटकर यांनी एक कानमंत्र दिला. हा कानमंत्र मी आयुष्यभर विसरलो नाही. प्रत्येक ठिकाणी त्याची मला मदतच झाली. मी आणि मुकुलजी एका चर्चासत्रात सहभागी झालो होतो. त्याठिकाणी मुकुलजींच्या टीमचे भाषण झाले त्यानंतर माझे भाषण झाले. मी मुकुलजीने सांगितल्याप्रमाणे सर्व डॉयलॉग म्हटले. त्यावेळी त्यांनी सांगितलेला डॉयलॉग म्हटल्यानंतर त्या सभागृहात एक मिनिटापेक्षा अधिककाळ टाळ्या वाजत होत्या. त्यानंतर मी माझे भाषण कसेबसेच संपवले. मात्र, त्याठिकाणी मुकुलजींचा पहिला नंबर आला तर माझा दुसरा नंबर आला.

त्यानंतर मुकुलजीने मला एक मंत्र सांगितला. मात्र, त्यांनी सांगितलेला हा मंत्र घेऊन याठिकाणी आलो नसल्याचे स्पष्ट करीत देवेंद्रजींने त्यांनी दिलेला मंत्र सांगितला. 'कुठेही जर भाषण करायला जायचे असेल तर असे समजायचे की, पुढे बसलले ते सर्वच जण मूर्ख आहेत आणि आपण एकटेच याठिकाणी विद्वान आहोत', असे समजून त्याठिकाणी भाषणाला उभे राहायचे, असे समजून भाषणाला उभे राहिले तर तुम्ही घाबरणार नाही व भीती मरून जाते, असा सल्ला त्यांनी दिला होता.

त्यानंतर झालेल्या एका चर्चासत्रात मी त्यांनी दिलेल्या त्या कानमंत्राचा अवलंब केला अन् जोरात भाषण केले. त्यावेळी झालेल्या स्पर्धेत मला पहिले पारितोषिक मिळाले, असा किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एका कार्यक्रमप्रसंगी सांगितला त्यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT