Saif Ali Khan attack : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री योगेश कदमांचे मोठे विधान; म्हणाले, 'घटनेमागे अंडरवर्ल्ड टोळी...'

Minister Yogesh Kadam statement : मुंबई सारख्या शहरात अभिनेत्याच्या घरात चोरटा शिरतोच कसा आणि त्यानंतर तो अभिनेत्यावर हल्ला करतोच कसा? असा प्रश्न विरोधकानी उपस्थित केला.
Yogesh kadam, saif ali khan
Yogesh kadam, saif ali khan Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री चोराने चाकूने हल्ला केला होता. या प्रकारानंतर राज्यातील पोलीस यंत्रणेने विविध अंगानी तपास सुरु केला आहे. अभिनेता सैफ अली खान याच्या घरात मध्यरात्री एका चोराने प्रवेश केला. त्याला सैफने अडवण्याचा प्रयत्न केला असता, चोराने त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मुंबई सारख्या शहरात अभिनेत्याच्या घरात चोरटा शिरतोच कसा आणि त्यानंतर तो अभिनेत्यावर हल्ला करतोच कसा? असा प्रश्न विरोधकानी उपस्थित केला. या प्रकारावरून गृह खात्याला टार्गेट केले जात असतानाच या प्रकरणी राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Yogesh kadam, saif ali khan
Saif Ali Khan Attacked:सैफवरील हल्ल्यानंतर मुंबई अनसेफ? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यामागे अंडरवर्ल्ड टोळी नाही, हा फक्त चोरीचा प्रकार असून कोणत्याही गँगशी याचा संबंध नाही. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. दुसरीकडे विरोधकांकडून या घटनेवरुन राज्याच्या गृह खात्यावर टीका केली जात आहे.

Yogesh kadam, saif ali khan
Saif Ali Khan Attacked : 'असा निष्क्रीय व कमजोर गृहमंत्री, महाराष्ट्राचे दुर्दैव' ; काँग्रेस नेत्याची खरमरीत टीका

या प्रकरणात गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणातील आरोपींच्याबाबत कुठल्याही गॅंगशी संबंध नाही. माजी मंत्री बाबा सिद्धकी, अभिनेता सलमान खान यांच्याबाबत जी घटना झाली त्या घटनेचा आणि या घटनेचा काही संबंध नाही. हा चोरीचा प्रकार आहे, असे दिसून येते. चोर घराच्या पाठीमागील भिंतीवरून चढला होता. चार माळ्याची बिल्डिंग आहे. त्या चार माळ्याच्या बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही कमी होते, असेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले आहे.

Yogesh kadam, saif ali khan
Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख मर्डर A टू Z स्टोरी; असा ठरला हत्येचा प्लॅन

या प्रकरणातील आरोपीला लवकर पकडले जाईल. पण यात कुठलाही गँग्स अँगल नाही. पोलीस यंत्रणेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. विरोधी पक्षाकडून या प्रकरणी नाहक आरोप केले जात आहेत. या गोष्टीला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असे योगेश कदम यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील आरोपीचे ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच आरोपीला पोलीस शोधून काढतील, असेही प्रसार माध्यमाशी बोलताना मंत्री कदम यांनी सांगितले.

Yogesh kadam, saif ali khan
Narendra Modi : 'स्थानिक'साठी महायुतीत स्वबळाचं टुमकं वाजवणाऱ्यांना PM मोदींचा मोठा झटका; मित्रपक्षांना सांभाळण्याचा का दिला सल्ला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com