<div class="paragraphs"><p>Devendra fadnavis ,Rajesh Tope</p></div>

Devendra fadnavis ,Rajesh Tope

 

sarkarnama

महाराष्ट्र

आरोग्य परीक्षेचं काम न्यासालाच का? फडणवीसांच्या प्रश्नाला टोपेंनी दिलं उत्तर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत ढिसाळ नियोजन आणि चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वीच गदारोळ झाला होता. ही परीक्षा घेणाऱ्या 'न्यासा' कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता, चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या आरोग्य विभागाच्या उमेदवारांच्या परीक्षा न्यासा कंपनीच घेणार आहे. 28 नोव्हेंबरला 589 विद्यार्थ्यांची 11 संवर्गाची परीक्षा नाशिक पुणे लातूर अकोला या जिल्ह्यांमध्ये घेतली जाणार आहे.

न्यासाच्या कारभाराविषयी बुधवारी हिवाळी अधिवेशनात (Assembly Winter Session 2021) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ( Devendra fadnavis) महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. काळ्या यादीत असलेल्या न्यासा कंपनीला ठाकरे सरकारनं पुन्हा काम दिले. नासाच्या अधिकाऱ्यांनी अनेक परीक्षांमध्ये गैरव्यवहार केले आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आरोग्य भरतीचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहचले असल्याचा आरोप फडणवीसांनी आज केला. ''गट क साठी 15 लाख रुपये आणि गट क साठी 8 लाख रुपयाचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये समोर आहे. अमरावतीमध्ये 200 विद्यार्थ्यांनी पैसे दिले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील तर सरकार यासंदर्भात चौकशी करणार का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

आरोग्य भरती परीक्षेचं काम न्यासालाच का? असा सवाल फडणवीसांचा राज्य सरकारला केला. यावर राजेश टोपे म्हणाले, ''न्यासाचे निवड ही उच्च न्यायालयानं दिलेल्या सूचनानुसार तपासणी करुन करण्यात आली आहे. न्यासाबाबत काही माहिची असल्यास विरोधी पक्षनेत्यांनी द्यावी, त्यांची चैाकशी निवृत्त मुख्य सचिवामार्फेत करण्यात येईल. आरोग्य परीक्षा पुन्हा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही,''

''आरोग्य परीक्षेबाबत जी ऑडिओ क्लिप समोर आली आहे, त्याची सायबर क्राईम चौकशी सुरू आहे. याची पाळेमुळे शोधून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्य विभागाने स्वतःहून पोलिसांकडे तक्रार (FRI) दिली आहे. मुलांवर अन्याय होऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. 'कुंपणच शेत खात,' ही पद्धत बदलण्याची गरज आहे. जनतेच्या हितासाठी जागा भरण्याचा हेतूने ही परीक्षा घेतली जाणार आहे. जे दोषी आढळले आहेत, पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील. मुख्यमंत्री यांनी ही दोषींवर कारवाई करणाऱ्यांना पाठीशी न घालण्याचे सांगितले आहे,'' असे टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे म्हणाले, ''ऑनलाईन परीक्षा घेण्याचा विचार केला जात आहे. ऑनलाईन परीक्षा घेतल्याने पेपर लिंक होणे वाचेल. परीक्षा पद्धत बदलण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची तयारी केली जात आहे. तत्कालीन सरकारने OMR पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्या पद्धतीनेच आरोग्य परीक्षा घेण्यात आल्या. अटी शर्थी पूर्ण झाल्यावर आयटी विभागाने या कंपन्यांना परवानगी दिली गेली. न्यासाला उच्चन्यायालयाने निर्दोष केले आहेत. न्यासा कंपनीला न्यायालयाच्या सुचनेनुसार तपासणी करूनच परीक्षा घेण्याचे टेंडर देण्यात आले. मग चौकशी कसली करायची. जी चौकशी करायची आहे, त्याची माहिती विरोधकांनी द्यावी,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT