सोबत एकही कार्यकर्ता नाही, तरीही त्यांची 'एन्ट्री' लक्ष वेधणारी!

प्रज्ञा सातव यांनी विधान भवनाच्या आल्या आणि वाटेत थांबलेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दिशेने वळून, नमस्कार केला आणि आर्शीवाद घेतला.
Pragya Satav

Pragya Satav

sarkarnama

मुंबई : राजकारणातलं घराणं, घरात मंत्रीपद, खासदारकीही, पक्षात मोठ वजन..मग काय ? अशा घराण्याचा; दिमाखच निराळ भोवती कार्यकर्ते, हातात फायली घेतलेला 'पीए'... आलिशान गाडी.. हे सारेच आलेच ! पण राजकारणात मातब्बर असलेल्या तरीही राजकीय बडेजाव न करता साधेपणात असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सातव घराण्याच्या सूनबाई अर्थात, प्रज्ञा राजीव सातव.

प्रज्ञा सावत (PRADNYA SATAV) या काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी, त्या विधान परिषदेच्या आमदार. आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनाला प्रज्ञा बुधवारी विधीमंडळात आल्या. साध्या पेहरावातल्या प्रज्ञा सातव यांची विधान भवनातील 'एन्ट्री' साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. प्रज्ञा सातव यांनी विधान भवनाच्या आल्या आणि वाटेत थांबलेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दिशेने वळून, लवून नमस्कार केला आणि आर्शीवाद घेतला. तेव्हा प्रज्ञा सातव यांच्यासोबत एकही कार्यकर्ता नव्हता, मुलगा पुष्कराजला घेऊन त्या आल्या होत्या.

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील सातव हे वर्षानुवर्षे काँग्रेसशी निष्ठा राखणारे घराणे, कळमनुरी मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. रजनी सातव या काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रीपदावर राहिल्या. पुढे त्यांचा मुलगा राजीव हे राजकारणात सक्रिय झाले आणि युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापासून हिंगोलीचे खासदार, राज्यसभेत गेले. काँग्रेसचे नेते राहुल यांचे निकट मानले जाणारे राजीव सातव यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले.

पोटनिवडणुक सातव घराण्याऐवजी रजनी पाटील यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. परंतु, विधान परिषदेचे सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना आमदारकी मिळाली. त्यानिमित्ताने सातव घराण्याचे राजकीय नेतृत्व प्रज्ञा सातव यांच्याकडे आल्याचे स्पष्ट झाले. आमदारानंतर झाल्यानंतर प्रज्ञा सातव विधीमंडळाच्या अधिवेशनाला बुधवारी वेळेत आल्या. माध्यमांशी संवाद न साधता विधीमंडळाचे कामकाज जाणून घेण्यासाठी त्या विधान परिषदेत गेल्या.

<div class="paragraphs"><p>Pragya Satav</p></div>
'हाऊस मे आओ' ; विरोधकांची मुख्यमंत्र्यांना हाक, किती दिवस लपून राहणार?

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा रंगली होती. मात्र, पक्षानं रजनी पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळं सातव यांच्या एका गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता मात्र, काँग्रेसने प्रज्ञा सातव यांच्यावर विश्वास दाखवत विधान परिषदेची उमेदवारी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com