Maharashtra government amends Cooperative Act sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात, उपपंतप्रधान होणार..., मोठ्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Devendra Fadnavis Sanjay Raut : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत वर्तुळात केंद्रात नसलेला व्यक्तीला उपपंतप्रधान करण्याचा विचार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

Roshan More

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण केंद्रात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, तरी देखील देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींना दिल्लीत हवे आहेत. संघाच्या अंतर्गत वर्तुळात त्याबाबत चर्चा आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत म्हणाले की, 'पंतप्रधान मोदी यांना देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलवायचे आहे. आणि त्यांना मोठी जबाबदारी द्यायची आहे. येवढे मला माहिती आहे.'

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत गोटातील माहितीनुसार, केंद्रात नसलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याची उपपंतप्रधान नियुक्ती व्हावी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. संघाचं म्हणणं आहे की, मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचा वारसदार म्हणून आपण जी व्यक्ती देणार आहोत तिची नियुक्ती उपपंतप्रधान म्हणून व्हावी. आणि सध्या ती व्यक्ती दिल्लीत नाही, येवढं मला माहिती आहे.',असे देखील राऊत यांनी म्हटले.

शाह पंतप्रधान होणार नाहीत...

' सध्या व्हेटींगला पंतप्रधानपदासाठी कोण आहेत तर ते अमित शाह आहेत. या देशात गृहमंत्रिपदावर राहिलेली व्यक्ती पंतप्रधान झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. अमित शाह हे प्राईम मिनिस्टर इन व्हेटींग आहेत, असे ते स्वतः मानतात. त्यामुळे ते प्राईम मिनिस्टर होणार नाहीत, राजनाथ सिंह यांच्या विषयी देखील मला साशंकता आहे.', असे देखील राऊत यांनी सांगितले.

आरएसएसच्या अंतर्गत गोटातील माहितीनुसार, केंद्रात नसलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याची उपपंतप्रधान नियुक्ती व्हावी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. संघाचं म्हणणं आहे की, मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचा वारसदार म्हणून आपण जी व्यक्ती देणार आहोत तिची नियुक्ती उपपंतप्रधान म्हणून व्हावी. आणि सध्या ती व्यक्ती दिल्लीत नाही, येवढं मला माहिती आहे.

शिवसेनेत लोकशाही

शिवसेनेबाबात कोर्टातील सुनावणी दरम्यान एकनाथ शिंदेंच्या वकिलाने ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लोकशाही नव्हती, असा युक्तिवाद केला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, शिवसेनेची संपूर्ण प्रक्रिया ही लोकशाही पद्धतीने चालते.'शिवसेना पक्षप्रमुखांची निवड सुद्धा लोकशाही पद्धतीने झाली आहे. आमच्यासह बाकीच्या नेत्यांची निवड देखील लोकशाही पद्धतीने झाली आहे. जे कोर्टात दावा करत आहेत, लोकशाही नाही त्या एकनाथ शिंदेंची निवड देखील त्याच लोकशाहीच्या कलमानेच झाली आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT