Kolhapur Politics : अंतर्गत वादामुळे महायुतीला तडे; मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात 'गोकुळ'मध्ये न्याय होता होता 'केडीसी'तही आग धुमसणार

Gokul Milk Union, Hasan Mushrif, Shivajirao Patil : गोकुळ दूध संस्थांमधील वाढीव दूध संस्थाबाबत शिवाजीराव पाटील आणि महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्याला भाजपमधून अंतर्गत पाठबळ असल्याचे बोलले जाते.
Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patil
Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patilsarkarnama
Published on
Updated on

Gokul election update : आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती मधील अंतर्गत धुसफुस या ना त्या कारणावरून गेल्या तीन महिनाभरापासून चव्हाट्यावर आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर होणारे आरोप, महाडिक गटाला होणारा बेदखलपणा आणि आमदार शिवाजीराव पाटील यांचा आक्रमकपणा, शिवसेनेतील अंतर्गत वर्चस्ववाद याला कारणीभूत ठरत आहे.

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये सुरू असलेले युद्ध, यावरून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात मागितलेली दाद, त्यामुळे काही अंशी हा वाद मिटेल, अशी चिन्हे असताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेची चौकशी लावणार असं वक्तव्य केले आहे. त्यानंतर हा वाद पुन्हा एकदा धुमसण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात गोकुळ मध्येच महायुतीला तडे पडणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

हसन मुश्रीफ यांनी शिवाजीराव पाटील यांच्या आरोपाला उत्तर देताना गोकुळच्या राजकारणात आणि बरेच पाणी वाहणार आहे, असे संकेत देऊन या राजकीय वादाला फोडणी दिली आहे. शिवाय चंदगड हेरे सरंजाम जमीन प्रकरणाचे श्रेय राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजेश पाटील यांचे वडील नरसिंहराव पाटील यांना दिल्याने शिवाजीराव पाटील यांना थेट डिवचले आहे.

Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patil
Rahul Gandhi vs Devendra Fadnavis : TET परीक्षेवरून राहुल गांधी आक्रमक; महत्वाच्या मागण्या करत थेट CM फडणवीसांना म्हणाले, या तीन गोष्टी आजच..., लगेच पलटवारही

गोकुळ दूध संस्थांमधील वाढीव दूध संस्थाबाबत शिवाजीराव पाटील आणि महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्याला भाजपमधून अंतर्गत पाठबळ असल्याचे बोलले जाते. मंत्री मुश्रीफ यांना अजूनही महाडिक गटावर संशय आहे. त्यातूनच अंतर्गत वाद पुन्हा धुमसत आहे. गोकुळ दूध संघाची प्रारूप यादी या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे अपात्र संस्थेचा खात्रीशीर आकडा समोर आल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला पुन्हा उकळी येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होणाऱ्या आरोप प्रत्यारोप बाबत गंभीर दखल घेत अशी वक्तव्य टाळावीत, अशा सूचना जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना दिल्याचे समजते. मात्र भाजपचे सहयोगी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा पाठलाग सोडलेला नाही. गोकुळ दूध संघाबरोबर आता कोल्हापूर जिल्हा बँकेतही चौकशी लावणार, असे वक्तव्य केल्यानंतर मंत्री मुश्रीफ आणि आमदार यांच्यातील वाद शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.

Gokul Politics; Hasan Mushrif, Shivaji Patil
NCP BJP alliance : पुण्यात मोठी घडामोड; विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत जाणार, उपमहापौर पदावर डील? माजी खासदाराने टाकला डाव...

नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध आमदार शिवाजीराव पाटील अशी लढत झाली आहे. महायुती म्हणून एकत्र लढत होत असताना अनेक ठिकाणी आमदार शिवाजीराव पाटील यांना राजकीय फटका देण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. विधानसभेला भाजपने दाखवलेली ताकद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बसलेला भाजपला फटका याची सल आमदार शिवाजीराव पाटील यांना आहे.

त्यामुळे गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शिवाजीराव पाटील यांनी सुरुवातीपासूनच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. शिवाजीराव पाटील यांचे विरोधक माजी आमदार राजेश पाटील यांना साथ देणारे मंत्री मुश्रीफ यांच्यामुळे चंदगड मध्ये आमदार पाटील यांना धक्का मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात ही पकड सैल करण्यासाठी आमदार पाटील यांचा आक्रमकपणा साहाजिकच आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील वाद कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी वारंवार होणाऱ्या आरोप प्रत्यारोपामुळे तो पुन्हा डोकं वर काढत आहे. एरवी आपण मुख्यमंत्र्यांच्या शब्दापुढे जाणार नाही, असे शिवाजीराव पाटील म्हणत असतील तर, मंत्री मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या केडीसी बँकेची चौकशी लावणार, हे का केले असावे? हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com