Devendra fadnavis  Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra fadnavis : परदेशी गुंतवणुकीची महाराष्ट्रात उंच उंच उड्डाणे - फडणवीसांचा दावा

Highest foreign investment in Maharashtra : देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात

Rashmi Mane

Mumbai News : गेली दोन वर्षे सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक १ वर असलेल्या महाराष्ट्रात २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७०,७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.

गेल्या अडीच वर्षाच्या काळात सातत्याने महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीला चालना देण्याचं काम सुरू असून राज्याला चौथ्या क्रमांकावरून एक नंबर वर आणले आहे. या तिमाईमध्ये राज्याला देशाच्या एकूण परकीय गुंतवणुकीच्या 52 टक्के परकीय गुंतवणुक मिळाली आहे

फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुढे आणलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या तिमाहीमध्ये देशात एकूण १,३४,९५९ कोटींची गुंतवणूक केली गेली. त्यापैकी ७०,७९५ कोटी म्हणजेच एकूण गु्ंतवणुकीच्या ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्र राज्यात केली गेली.

याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले,"राज्यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असताना एकूण ३,६२,१६१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती.अडीच वर्षांत आम्ही ५ वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत ३,१४,३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली आहे. अद्याप दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी बाकी आहे".

फडणवीस यांच्या दाव्यानुसार अन्य राज्यात केली गेलेली गुंतवणूक अशी आहे;

  • कर्नाटक (19,059 कोटी),

  • दिल्ली (१०,७८८ कोटी),

  • तेलंगणा (९०२३ कोटी),

  • गुजरात (८५०८ कोटी),

  • तामिळनाडू (८३२५ कोटी),

  • हरियाणा (५८१८ कोटी),

  • उत्तरप्रदेश (३७० कोटी),

  • राजस्थान (३११ कोटी)

या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे.

यापूर्वी २०२२-२३ या आर्थिक वर्षात १,१८,४२२ कोटी (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक)तर २०२३-२४ या वर्षात १,२५,१०१ कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक) रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात केली गेली असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT