Devendra Fadnavis on Railway accident sarkarnama
महाराष्ट्र

Jalgaon railway accident : 'अत्यंत दुर्दैवी घटना! स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन' ; फडणवीस यांची रेल्वे दुर्घटनेवर पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Jalgaon Pushpak Express Railway accident : जळगांव ते परांडा रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या मारल्या. यामुळे मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.

Aslam Shanedivan

Jalgaon News : जळगावरमधील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने मोठी दुर्दैवी घटना घडली. या घटनेत 11 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण गंभीर जखमी आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीष महाजन घटनास्थळावर पोहचले असून जखमींना रूग्णालयात हालवले जात आहे. या घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देताना मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असल्याचे म्हटले आहे.

परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा गाडीत पसरली. यावेळी दरवाजाजवळ बसलेल्या 30 ते 35 जणांनी थेट रेल्वे बाहेर उड्या मारल्या. यावेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने 11 रेल्वे प्रवाशांना चिरडले. तर पाच ते सहा जण गंभीर जखमी आहेत. या घटनेवरून फडणवीस यांनी दावोस येथून एक्सवर ट्वीट करत दु:ख व्यक्त व्यक्त केलं आहे. फडणवीस यांनी, जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करत आहे. जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आल्याचेही ते म्हणाले.

तसेच ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

सर्व सूचना दिल्या आहेत : एकनाथ शिंदे

दरम्यान या घटनेची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी दुर्घटनेची माहिती घेतली आहे. त्यांनी याबाबत, या घटनेची माहिती मिळाली असून आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एक्सप्रेसमधून काही प्रवाशांनी उड्या मारल्यामुळे सदर दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

रेल्वेचे अधिकारी आणि बचाव पथके देखील घटनास्थळी पोहचत आहेत. नक्की किती प्रवासी जखमी आहेत आणि किती जणांचा यात मृत्यू झाला याची अद्याप आकडेवारी हाती आलेली नाही. मात्र तातडीने बचाव पथकांनी जखमींना रुग्णालयात हलवावे आणि योग्य ते उपचार करावेत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे. त्यांनी ही माहिती एक्सवर ट्वीट करत दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT