Maharashtra Breaking News : आत्ताची सर्वात मोठी बातमी : आगीच्या अफवेने प्रवाशांच्या धावत्या रेल्वेतून उड्या, दुसऱ्या एक्सप्रेसने चिरडले

Pushpak Express Bengluru Express Jalgaon Railway News : जळगांव ते परांडा रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली आहे.
Jalgaon Railway Accident
Jalgaon Railway AccidentSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगावरमधील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव-परांडा रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूने वेगात येत असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातामध्ये किती प्रवाशांचा मृत्यू झाला, किती प्रवासी जखमी झाले आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, मृतांचा आकडा मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पुष्पक एक्सप्रेस थांबवण्यात आली असून प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jalgaon Railway Accident
Nitish Kumar: जी भीती होती तेच घडलं; नितीश कुमारांची पलटी मारण्यास सुरुवात; भाजप सरकारचा पाठिंबा काढला

हा अपघात सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या दिशेने निघालेल्या पुष्पक एक्सप्रेसला अचानक ब्रेक लावण्यात आल्याने चाकाजवळ आगीच्या ठिणग्या उडाल्या. एक्सप्रेसच्या एका डब्यामध्ये या ठिणग्यांवरून आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे घाबरून जात या डब्यातीलल ४० ते ५० प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या रेल्वेतून बाहेर उड्या मारल्या.

प्रवासी उड्या मारत असतानाच समोरून बेंगळुरू एक्सप्रेस जळगावच्या दिशेने निघाली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांना या गाडीने उडवल्याची समजते. आतापर्यंत ३० ते ४० प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजते.

Jalgaon Railway Accident
Manikrao Kokate politics: शेतकऱ्यांत खळबळ, नाशिकमध्येही बोगस पिक विम्याबाबत कारवाई सुरू

रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाकडून तातडीने मदत व आरोग्य पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. स्थानिक आमदार, पालकमंत्र्यांकडूनही या घटनेची माहिती मिळताच सर्व यंत्रणांना अलर्ट केल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com