Mumbai News : बीड येथील जिल्हधिकारी कार्यालयावर शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात फरार असलेल्या आरोपीना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बीड येथील आक्रोश मोर्चात सहभागी होऊन मोर्चातील सहभागींची जनभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यत पोहचवण्याचा शब्द आमदार अभिमन्यू पवार यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आमदार पवार यांनी सर्वसामान्यांची जनभावना कानावर घातली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेत. बीड येथील निर्घृणपणे हत्या करण्यात आलेले दिवंगत सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या लेकीच्या हाकेवरुन निघालेल्या आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या जनसामान्यांची जनभावना आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी फडणवीस यांच्या कानावर घातली.
या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः अत्यंत गंभीर आहेत. याप्रकरणी गुन्हेगारांची बँक खाती गोठवण्याची आणि संपत्ती जप्त करण्याची कारवाई सीआयडीकडून सुरू आहे, उर्वरित फरार आरोपींची युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू आहे. फरार असलेल्या सर्व आरोपीना लवकरच अटक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला
संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती , खासदार बजरंग सोनवणे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अभिमन्यू पवार यांच्यासह सर्व पक्षांचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.