Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड याचं लोकेशन सापडलं; 'सीआयडी'ची नऊ पथके मागावर

CID officers Beed Santosh Deshmukh murder Walmik Karad extortion case : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित वाल्मिक कराड याच्या शोधासाठी सीआयडीचा कस लागला आहे.
Walmik Karad
Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत संशयित आणि खंडणीच्या गुन्ह्यात पसार असलेला वाल्मिक कराड याच्या मुसक्या आवळण्यासाठी 'सीआयडी'ची नऊ पथके कार्यरत आहेत. घटनेला 20 दिवस झाले, तरी संतोष देशमुख यांच्या हत्येची उकल आणि त्यातील प्रमुख मास्टरमाईंडला अटक झालेली नाही.

या हत्येत वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्याचा शोध घेतला जात आहे. वाल्मिक कराड याच्या शोधात पोलिसांना शेवटचे मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैन इथं आढळलं असून, त्याचा मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 20 दिवस होऊन गेले आहे. या हत्येच्या घटनेवरून सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील (Mahayuti) भाजप आमदार सुरेश धस सुरवातीपासून आक्रमक आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा लावून धरला. बीडमध्ये शनिवारी निघालेल्या मोर्चात त्यांनी आक्रमक अशी भूमिका मांडली. याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील राज्याच्या राजकारणातील गुन्हेगारीवरून संतापलेल्या आहेत. बीडमध्ये त्यांनी 'सत्य'शोधक आंदोलन सुरू केले आहे.

Walmik Karad
Santosh Deshmukh Murder Case : मंत्री आठवलेंना अंजली दमानियांनी ऐकविला 'व्हॉईस मेसेज'; 'मोठी' मागणी करताना व्यक्त केली 'ही' भीती, पण...

अंजली दमानिया यांनी आज जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड (BEED) कार्यालयातील अधीक्षकांची भेट घेतली. तसेच या घटनेतील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. या हत्याचा तपास सीआयडी करत आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना अगोदरच अटक केलेली आहे. तसेच या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचही नाव समोर आहे. याच दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या वाहनातून सीआयडी अधिकाऱ्यांनी दोन मोबाईल जप्त केले आहेत. यातील डाटा रिकव्हर करण्यासाठी मोबाईल प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आली आहेत. यामुळे या हत्येतील तपासाला वेग येणार आहे.

Walmik Karad
Maharashtra Politics News LIVE UPDATES : नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या - बाळासाहेब थोरात

'सीआयडी'ची नऊ पथके, 100 जणांची चौकशी

संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड याचा मास्टरमाईंड म्हणून उल्लेख होत आहे. आमदार सुरेश धस यांनी थेट आरोप केले आहे. हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निटकवर्तीय आहे. त्यामुळे त्याचाही सीआयडीकडून शोध आहे. यासाठी 'सीआयडी'ने नऊ पथके नेमली आहेत. त्याचा माग काढत आहे. अद्याप ही त्याच्या कोणताही पत्ता तपास यंत्रणांना मिळालेला नाही. सीआयडीने मात्र या घटनेत आतापर्यंत 100 जणांची चौकशी केली आहे.

वाल्मिक कराडचा मोबाईल 13 डिसेंबरपासून बंद

वाल्मिक कराड याच्या शोध घेताना त्याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनी असल्याचे समोर आले आहे. 11 डिसेंबरला त्याने त्याच्या समाज माध्यमावर उज्जैनमधील फोटो शेअर केले होते. यावेळी त्याच्याबरोबर पोलिस संरक्षण देखील होते. तसेच त्याचा मोबाईल 13 डिसेंबरनंतर बंद झाला, तो आतापर्यंत बंद आहे, अशी माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड सरेंडर करणार असल्याची देखील बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकत आहेत.

जप्त वाहनांवर आरोपींचे ठसे...

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यावरील ठसे आरोपींचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पसार आरोपींचा बँक खाती गोठवण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मालमत्ता देखील सील करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com