महाराष्ट्र

Devendra Fadnavis : अनावश्यक परवानग्यांचा खेळ आता बंद होणार; रखडलेल्या प्रकल्पांना मिळणार 'बूस्ट'; देवेंद्र फडणवीस यांचे वन विभागाला कडक निर्देश!

Devendra Fadnavis forest department orders : वन विभागातील अनावश्यक परवानग्यांचा अडथळा दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडक निर्देश. रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता; जाणून घ्या महत्त्वाचे निर्णय.

Rashmi Mane

मुंबई : राज्यातील विकासकामांना वन विभागाच्या परवानग्यांमुळे होणारा विलंब आता कमी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाला महत्त्वाचे निर्देश देत अनावश्यक परवानग्यांमुळे विकास प्रकल्प रखडू देऊ नका, असे स्पष्ट केले आहे. विशेषतः व्याघ्र भ्रमणमार्गाबाहेरील विकासकामांना विनाकारण अडथळे निर्माण करू नयेत आणि प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील रखडलेले विकास प्रकल्प, वन विभागाच्या परवानग्या आणि स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या संधी यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

गडचिरोलीतील विकासकामांना गती देण्यावरही मुख्यमंत्र्यांनी विशेष भर दिला. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. वन विभागाच्या प्रक्रियेमुळे या कामांना विलंब होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने निर्णय घ्यावेत, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.

दरम्यान, वनालगतच्या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार बांबू लागवडीला प्रोत्साहन देणार आहे. बांबूपासून इथेनॉल निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) एकत्रितपणे काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT