Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra politics : फडणवीस - ठाकरे एकाच मंचावर आल्यानंतर आता आणखी दोन बडे नेते एकत्र; भाजप-ठाकरेंच्या शिवसेनेतील जवळीक वाढतेय?

Secret meeting between two leader News : राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांचे निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीने पुणे, मराठवाडा आणि नागपूर पदवीधर अशा 3 तर महायुतीने पुणे व अमरावती शिक्षक या 2 जागा जिंकल्या आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या पाच जागेचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या मित्रपक्षातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामध्ये भाजप व एकनाथ शिंदे यांच्या सेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी-विरोधक यांच्यात जोरदार जुंपली आहे.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संघर्षात माजी मुख्यमंत्री व ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,मुंबईत कार्यक्रमाचये निमित्ताने एकत्र आल्याचे पाहवयास मिळाले. तर दुसऱ्याच दिवशी एकमेकांवर सातत्याने जोरदार शा‍ब्दिक हल्ले चढविणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांच्याशी हसत हस्तांदोलन करीत जॅकेट दिसले. त्यामुळे भाजप- उद्धव ठाकरेंच्या सेनेतील वाढती जवळीकता चर्चेचा विषय ठरली आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांचे निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीने पुणे, मराठवाडा आणि नागपूर पदवीधर अशा 3 तर महायुतीने पुणे व अमरावती शिक्षक या 2 जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात त्यातही महायुतीत आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधू यांच्यात बंद दरवाजाआड गुप्त चर्चा झाली.

गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकाच मंचावर आले, तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि मंत्री आशिष शेलार एकाच मंचावर दिसले. विशेष म्हणजे, संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्याशी हसत हस्तांदोलन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या पाच वर्षाच्या काळात भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांमधील कटुता कमी होतेय का? राजकीय समीकरणं बदलत आहेत का? असे दोन दिवसांत घडलेल्या या राजकीय भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT