Ashok Chavan, devendra Fadanvis  Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याला देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले ?

Bjp News: एका महिन्यातच मराठवाड्यातील काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांना आपलेसे करीत नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील काँग्रेसचा बालेकिल्ला काबीज केला.

Sachin Waghmare

Mumbai News : भाजपने गेल्या काही दिवसांपासून धक्कातंत्राचा वापर केला आहे. गेल्या दोन वर्षांतील फोडाफोडी करीत राज्याच्या राजकारणात दोनदा भूकंप घडवला. त्यानंतर फेब्रुवारी या एका महिन्यातच मराठवाड्यातील काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांना आपलेसे करीत नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील काँग्रेसचा बालेकिल्ला काबीज केला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील हे दोन नेते भाजपवासीय झाले. त्यानंतर आता भाजपकडून काँग्रेसच्या काही दिग्गज माजी मंत्र्यांभोवती गळ टाकला जात असल्याचा अंदाज राजकीय धुरिणींनी व्यक्त केला. या त्यांच्या दाव्याला बळ देणारा घटनाक्रम शुक्रवारी विधिमंडळाच्या आवारात घडला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक नेता तथा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.

दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधील ४० आमदार फोडत शिवसेना-भाजपला जवळ केले. त्यानंतर काँग्रेसमधील अशोक चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सगळ्या फाटाफुटींनंतर आताही भाजपकडून काँग्रेसपासून दुरावलेल्या नेतेमंडळींना ऑफर दिली जात आहे. (Devendra Fadnavis News)

शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनावेळी काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री विश्वजित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील व्हायरल झालेल्या संवादामुळे या नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस विश्वजित यांना उद्देशून म्हणाले की, 'विश्वजित थांब, लवकरच तुझा मुहूर्त लावतो'. फडणवीस यांनी केलेल्या या विधानामुळे आता विश्वजित कदम हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

'या' चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

राज्य विधिमंडळाच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) कामकाज संपवून विधिमंडळ परिसराबाहेर निघाले होते. त्यांच्या अवतीभवती नेहमीप्रमाणे भाजप आमदारांचा गराडा होता. त्याचवेळी पाठीमागून विश्वजित कदम (Vishwjeet Kadam) आले. तेव्हा विश्वजित कदम यांनी फडणवीस यांच्याशी बोलायला सुरुवात केली. या दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. त्यावेळी फडणवीसांच्या एका वाक्यावर विश्वजित कदम यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. पुढील काहीवेळ दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरू होता आणि त्यानंतर फडणवीस निघून गेले. परंतु, आता या दोघांमधील वार्तालापाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अविनाश भोसलेंवर ईडी कारवाईची टांगती तलवार

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत काँग्रेसचे आठ ते दहा आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. या भाजपच्या संपर्कात असलेल्या आमदारांच्या यादीत विश्वजित कदम यांचे नावही होते. विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांच्यावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. या दबावापोटी विश्वजित कदम भाजपसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा अधूनमधून प्रसारमाध्यमांत सुरू असते.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या प्रवेशानंतर काही दिवसांपूर्वी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरल्यानंतर विश्वजित कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा थेट फडणवीस यांनीच 'मुहूर्त' काढण्याची भाषा केल्याने विश्वजित कदम भाजपमध्ये (Bjp) जाणार का, काँग्रेसमध्येच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

R

SCROLL FOR NEXT