Devendra Fadnavis News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. भाजप,काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसह जोरदार तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान,लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला कांदा प्रश्नाचा चांगलाच फटका होता. आता विधानसभेला सामोरे जातानाच मोदी सरकारने आपली चूक सुधारत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने कांदा, बासमती तांदळावरील निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटविण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर या निर्णयाचे स्वागत करणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी( Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारने आमच्या बळीराजासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मी त्यांचा अतिशय मनापासून आभारी असल्याचं म्हटलं आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे निर्णय निश्चितपणे क्रांतीकारी ठरतील आणि त्यामुळे आमच्या कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना जास्त फायदा व्हावा यासाठी प्रचंड मोठे निर्णय घेतल्याची माहिती दिली.
ते म्हणाले, कच्चा तेलावर 20 टक्के आयात शुल्क आणि रिफाईंड तेलावर आयात साडेबारा टक्के वरून साडे 32 टक्के आयात शुल्क लावण्यात आला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
देवेंद्र फडणवीस पोस्टमध्ये म्हणतात,शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली असून सगळ्या निर्णयाचा फायदा सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुखावणारा आहे.
यावेळी त्यांनी कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरुन 20 टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे संपविली आहे. यातून कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळेल असाही दावा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.