Thane News : 'धर्मवीर' आणि शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा एकेकाळी शिवसेनेत जबरदस्त वचक होता. त्यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम हे दिघेंचं सत्ताकेंद्र होतं. शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आनंद आश्रमावर चांगलाच दबदबा राखून आहे.
याचदरम्यान, आनंद आश्रमात शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.यावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी शनिवारी (ता.14)मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राऊतांवर चांगलेच तोंडसुख घेतले.ते म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जर लुटीचे पैसे आनंदाश्रमात ठेवले जात असल्याचा आरोप केला असेल तर तो धर्मवीर दिघे यांचा अपमान आहे असेही त्यांनी सांगितले.
संजय राऊतांच्या टीकेला आता शिंदे शिवसेनेकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी राऊंतावर गंभीर आरोप केला आहे.म्हस्के म्हणाले, संजय राऊत दिघे द्वेष्टा माणूस आहे. त्यांचा या माणसाने कायमच तिरस्कार केला आहे. खोपकर हत्याकांडानंतर संजय राऊत यांनी तेव्हा लोकप्रभामध्ये जो लेख लिहिला होता. त्यात काही गोष्टी त्यांनी लिहिल्या होत्या. त्यामुळे दिघे यांना टाडा लागला. दिघे यांना तुरुंगात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. राऊतांमुळेच आनंद दिघेंना टाडा लागल्याची टीका म्हस्के यांनी केली.
शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात नोटा उधळतानाच्या व्हायरल व्हिडिओवरुन शिंदे गटावर टीकेची झोड उठवली होती. बारमध्ये ज्या प्रकारे पैसे उधळावेत, त्या पद्धतीने आनंद आश्रमात पैसे उधळले गेले,असा घणाघात खासदार राऊतांनी केला होता.
राऊत म्हणाले,आनंद दिघेंच्या घरात भिंतीवर एक हंटर लावलेला होता.काल आनंद आश्रमात झालेला धिंगाणा त्यांनी पाहिला असता, तर भिंतीवरील हंटर काढून लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढलं असतं. जे स्वतःला आनंद दिघेंचा वारसादार मानतात, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, हा आनंद दिघेंचा वारसा नाही. ते अशाप्रकारच्या लोकांचं कधीच समर्थन करत नसत असंही राऊतांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.