Devendra Fadnavis On Ajit Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : अजितदादांच्या इफ्तार पार्टीतील वक्तव्यावर फडणवीसांचे विधान, पुढे काय म्हणाले?

Devendra Fadnavis On Ajit Pawar : नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारामुळे अद्याप येथील समाजजीवन पूर्वपदावर आलेले नाही. मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

Aslam Shanedivan

Pune News : राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून वाद उफाळला असताना मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करत मुस्लिम समाजाला धीर देण्याचे काम केलं आहे. तसेच आपण समाजाबरोबर असून जो कोणी डोळे वटारून पाहण्याचा प्रयत्न करेल त्याला सोडणार नाही, असा इशारा दिला आहे. यावरून राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर आपली सहमती दर्शवली आहे. तर मुस्लिम समाजाकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर आपणही सोडणार नाही, असे म्हटलं आहे. पण यावेळी त्यांनी नागपूर दंगलीत ज्यांचा हात होता त्यांनाही सोडणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

राज्यात मागील काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून वाद उफाळला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कबर हटवण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने केली आहेत. पण नागपूरमध्ये हिंसाचाराची ठिणगी पडली. यामुळे राज्यातील सध्याचे वातावरण तणावाचे बनले आहे. कबरीवरून मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे इफ्तार पार्टीचे आयोजन करत नवा संदेश दिला. यावेळी अजित पवार यांनी, मुस्लीम समुदायाला धमकी देण्याचा किंवा कोणी डोळे वटारून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, असा इशारा दिला.

आता याच इशाऱ्यावरून राजकीय टीका सुरू झाली असून भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे. त्यांनी अजित पवारांनी डोळे तपासणाच्या नवीन व्यवसाय सुरू केला वाटतं, असा टोला लगावला होता. यावरून आता महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस यांनी, अजित पवार यांनी, इफ्तार पार्टीत काय वक्तव्य केलं आहे. कोणता इशारा दिलाय ते मला माहित नाही. पण आपल्याकडे चांगलं काम करणारा कोणीही असो. मग तो मुस्लिम असो किंवा आणखी कोणाही. अशा देशभक्त व्यक्तीला जर कोणी त्रास दिला तर त्याला आम्हीही सोडणार नाही. पण दोषी आढळणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. मग तो कोणत्याही जाती किंवा धर्माचा असो. देशभक्त व्यक्तींना त्रास देणाऱ्याला आम्ही सोडणार नाही, असे म्हटलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी, मुस्लीम समुदायाला रमजानच्या शुभेच्छा देताना, आपला देश विविधतेत एकतेचे प्रतिक आहे. यामुळे मुस्लीम समाजाने विभाजनवादी शक्तींच्या जाळ्यात अडकू नये. मी तुमचा बंधू म्हणून समाजाच्या पाठिशी आहे. त्यामुळे कोणी मुस्लीम बांधव आणि भगिनींना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, असे म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT