Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सिंहस्थ कुंभमेळ्याची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन आणि सर्व प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्र्यंबकेश्वरला भेट दिली. ही त्यांची कुंभमेळ्याची पहिलीच नाशिकची बैठक होती. मात्र या बैठकी आधीच साधूमध्ये नाराजी नाट्य रंगले होते. त्याची झलक मुख्यमंत्र्यांना पाहायला मिळाली. तो चर्चेचा विषय होता.
आजच्या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर येथील सर्व दहा आखाड्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा अनुभव विचारात घेऊन नियोजन करण्याचे निवेदन दिले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांसह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक नागरिकांना आणि साधूंना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा फटका बसता कामा नये, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
या दौऱ्याच्या निमित्ताने मंत्री महाजन गेले दोन दिवस नाशिकला होते. काल रात्री त्यांनी त्यांचा संपर्क असलेल्या महामंडलेश्वर रघुमुनी या महंताची भेट घेतली. मंत्री महाजन आणि रघुमुनी यांचा चांगला संपर्क असल्याने तो वादाचा विषय ठरला. त्याचे पडसाद मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर देखील उमटले.
संबंधित रघुमुनी हे बडा उदासीन आखाड्याचे महंत आहेत. त्यांना विविध आर्थिक तक्रारीमुळे आखाड्याने बहिष्कृत केले आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील सर्व दहा आखाड्यांनी रघुमूनी यांना मुख्यमंत्री फडणवीस येंनी भेटू नये, अशी नाराजी प्रशासनाला कळविली होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात रघुमुनी यांची भेट निश्चित होती. याबाबत साधूंनी उग्र भूमिका घेतल्याने प्रशासन अधिक सावध झाले होते. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांना याबाबत सूचित करून संबंधित साधूची भेट रद्द केली. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील साधू समाधानी झाले.
मुख्यमंत्र्यांची चर्चा करताना सर्वसाधारण समाधान व्यक्त केले. अप्रत्यक्षपणे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या विषयी साधने नाराजी व्यक्त केली आहे. कुंभमेळ्याचा कारभार मुख्यमंत्र्यांनी स्वतःच आपल्या हाती घ्यावा. तुम्हीच चांगले काम करू शकाल आणि सिंहस्थ यशस्वी होईल अशा शुभेच्छा साधुनी दिल्या.
महामंडालेश्वर शंकरानंद सरस्वती, महामंडालेश्वर धनंजय गिरी, महामंडालेश्वर महेंद्र गिरी, महामंडालेश्वर गोपालदास, महामंडालेश्वर संजय पुरी, महामंडालेश्वर संजय गिरी आदी सर्व दहा आखाड्यांचे प्रतिनिधी यावेळी होते. त्यानिमित्ताने सिंहस्थ कुंभमेळ्यात सातत्याने साधूंच्या विविध विषयांवरून तक्रारी असतात. त्यात वाद देखील असतात. त्याची चुणूक आज मुख्यमंत्र्यांना आपल्या दौऱ्यात झाली. आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांसह विविध लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते.
-------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.