Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Video : मनोज जरांगेंचे उपोषण सुरु असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं वक्तव्य, 'न्यायाच्या कसोटीवर...'

Manoj Jarange Patil Hunger Strike Maratha Reservation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी अडचण आली त्या त्या वेळी सरकारने निर्णय घेतला आहे.

Roshan More

Devendra Fadnavis News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी आजपासून आंतरवाली सराटीमध्ये उन्हात उपोषण सुरू केले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु ठेवले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी अडचण आली त्या त्या वेळी सरकारने निर्णय घेतला आहे. या संदर्भात मी येवढच सांगेल की, सरकारची भूमिका पारदर्शक आहे. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे. आणि या पूढे देखील सरकारची भूमिका सकारात्मक असेल.

पुढे बोलताना ते म्हणाले, 'आमचं सरकार सर्व समाजासाठी सकारात्मक काम करणारं सरकार आहे. आम्ही समाजांना एकमेकांच्या पुढे आणून भांडण करत नाही. सगळ्यांच भलं कसं होईल, असा प्रयत्न करतो. विशेषता मराठा समाजाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगतो जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदेसाहेबांनी घेतले तेवढे इतिहास कधी झाले नाहीत. आणि पुढेही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय आम्ही घेतच राहू.'

'फक्त हे निर्णय घेत असताना देशाचे संविधान, देशाचे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याच मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशाचे अवलंबन न करता एखादा निर्णय घेतला तर त्यातून केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही. त्यामुळे संविधान आणि न्यायाच्या कसोटीवर जे जे निर्णय टिकतील ते ते निर्णय आम्ही घेऊ.', असे देखील त्यांनी जरांगे पाटील यांचे नवा न घेता म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT