Devendra Fadnavis Rahul Gandhi  sarkarnama
महाराष्ट्र

Congress protest : विरोधकांच्या सरन्यायाधीशांच्या भेटीच्या मागणीवर CM फडणवीसांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, 'काँग्रेसचा संविधानावर …’

Congress protest News : विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : देशभरातील वातावरण निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून चांगलेच तापले आहे. विरोधकांचे गेल्या आठवडाभरापासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे मुंबई व दिल्लीत पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. सीजेपीच्या नेत्यांना अटक करून एक दिवसात सुटका करण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षाचे आमदार व पदाधिकारी सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट घेणार होते. मात्र, सोमवारी सकाळीच सरन्यायाधीशांनी भेटीस नकार दर्शवला.

त्याऐवजी कोर्टात याचिका दाखल करा, मी सुनावणी घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांकडून केल्या जात असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच प्रसार माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर आरोप करतानाच पलटवार केला आहे. विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले, ‘सरन्यायाधीशांच्या भेटीची मागणी करत आहात. कोणत्या संविधानात लिहिले आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कोणत्या मोर्चाला सामोरे जातात का, मी मानतो की, जे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, ते योग्य आहे. त्यासाठी तुम्ही कोर्टात जावा. कोर्टात जाऊन लढा. '

काँग्रेसचा (Congress) संविधानावर विश्वास नाही. हे संविधानविरोधी आहे. सरन्यायाधीशांनी कायदेशीरित्या संविधानिक अधिकाराचा वापर करून भेटीस नकार दिला. मी कोणत्या मोर्चाला भेटू शकत नाही. हे लोक सरन्यायाधीशांना शिवागीळ करत आहेत. संविधानिक संस्थावरून लोकांचा विश्वास उडला पाहिजे, याचे षडयंत्र विरोधी पक्षाकडून आखले जात आहे.

इंडिया आघाडीच्यावतीने सोमवारी दुपारी सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) म्हणाले, ‘काँग्रेस आणि विरोधी पक्ष देशापुढच्या प्रश्नांवर आंदोलन करणार असेल. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणार असेल. देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आंदोलन करणार असेल तर समजू शकतो. मात्र, निवडणुकीत पराभव होतो म्हणून कारण शोधण्यासाठी मोर्चा काढणे योग्य नाही. काँग्रेसने सर्वच घटनात्मक संस्था शंकास्पद करून टाकल्या आहेत.’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT