Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस संतापून म्हणाले, '...तर मी राजीनामा देईल, राजकारणातून संन्यास घेईल'

Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil : मी शिंदे साहेबांना अडथळा निर्माण करत असल्याचा चुकीचा नेरेटिव्ह सेट केला जातो आहे. मात्र मी शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Roshan More

Devendra Fadnavis News : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना थांबवले, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता. या आरोपाला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

'मला याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. मात्र, राज्याचे सर्व अधिकारी हे मुख्यमंत्र्याकडे असतात. मी तर त्याच्यापुढे जाऊन म्हणणे की जरांगे पाटील जे म्हणत आहे त्या विषयी थेट एकनाथ शिंदे साहेब यांना विचारावे.'

'मी एकनाथ शिंदे साहेबांना थांबवले हे सिद्ध झाले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल. फक्त राजीनामाच नाही तर राजकीय संन्यास घेईल. मराठा समाजासाठी जे निर्णय झाले ते मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घेतले मी त्यांच्यामागे भक्कमपणे उभा राहिलो', असे म्हणत देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी शिंदे साहेबांना अडथळा निर्माण करत असल्याचा चुकीचा नेरेटिव्ह सेट केला जातो आहे. मात्र मी शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लाडक्या बहिणीवरून विरोधकांवर निशाणा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये विरोधकांनी अडथळे निर्माण केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे योजना आता आपल्याकडे खेचण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी त्यांची सत्ता असताना ही योजना का नाही आणली. बहि‍णींना सगळे माहित आहे. त्या महायुतीच्या मागे भक्कमपणे उभ्या राहतील,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT