Raigad, 19 August : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीही विश्वासघात करणारी पार्टी आहे, हे मी आज जाहीरपणाने सांगतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं, हेच त्यांचं काम आहे, हे आज आपण कर्जतमध्ये पाहत आहात. या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्वच विश्वासघातकी आहे, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नाव न घेता सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील शिवसेनेच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी सडकून टीका केली. आमदार थोरवे यांच्या टीकेमुळे रायगडमध्ये महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरही असाच वाद रंगला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्ह्यातील नेतृत्व हेच विश्वासघात करणार आहे. त्याची तमा आम्ही बाळगणार नाही. आम्ही तर जाहीरपणे सांगितले आहे की तुम्हाला लढायचे असेल तर आमच्या विरोधात जाहीरपणे लढा. पण महायुतीच्या विरोधात होणारी गद्दारी आम्ही खपवून घेणार नाही.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की, भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष याशिवाय महायुतीमधील जे घटक पक्ष प्रामाणिकपणे आपल्यासोबत आहेत, त्या सर्वांना आपण सोबत घेऊन जाऊ. ज्यांना आपल्या विरोधात जायचं आणि आपल्या विरोधात काम करायचं आहे, त्यांनी जाहीरपणे आपल्या विरोधात जावे. त्या विरोधाला सक्षमपणे सोमोरे जाण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे, असा इशाराही आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे.
थोरवे म्हणाले, विधानसभेच्या आगामी निवडणुकीत कोणी कितीही मनसुबे आखू द्या. पण कर्जत मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. ज्यांना कोणाला निवडणुकी लढवायच्या आहेत, त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं.
युतीचा धर्म पाळायचा नसेल तर मी मागच्या वेळीही सांगितलं आहे की, महायुतीमध्ये राहात आणि महायुतीच्या विरोधात काम करता. त्यावेळी त्यांना आम्ही महायुतीच्या बाहेर पडा, असे आम्ही त्यांना मागील वेळीच सांगितले आहे.
महायुतीच्या बाहेर पडून मग आमच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात या. महायुती सरकारचा निधी वापरायचा आणि सरकारच्या विरोधात जाऊन काम करायचं, हे जास्त दिवस चालणार नाही. हे जिल्ह्यातील आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांनाही समजणार आहे.
ज्या पद्धतीने आपण चालला आहात. ज्या पद्धतीचे काम आपण संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरू केलेले आहे. त्याबद्दल जनता आपल्याला माफ करणार नाही, हे मी जाहीरपणे सांगतो, अशी टीकाही त्यांनी आमदार थोरवे यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.