Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Video : 15 लाख 70 कोटींची गुंतवणूक, CM फडणवीस विरोधकांवर कडाडले, ' मन की जलना का...'

Devendra Fadnavis Davos Economic Forum summit : दावोसमध्ये होणारी गुंतवणूक ही भारतातील कंपन्यांमधूनच होत आहे, असे टीका विरोध पक्षातील नेत्यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

Roshan More

Devendra Fadnavis News : परदेशी गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये आहेत. त्यांनी महाराष्ट्रात तब्बल 15 लाख 70 कोटींची गुंतवणूक झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. विशेष म्हणजे सर्वच क्षेत्रात गुंतवणूक झाली असून विदर्भ, एमएमआरडी क्षेत्र,नाशिक, छत्रपती संभाजीनगर या भागांना या गुंतवणुकीचा मोठा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दावोसमध्ये होणारी गुंतवणूक ही भारतातील कंपन्यांमधूनच होत आहे, असे टीका विरोध पक्षातील नेत्यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, मी हिंदीमध्ये एका शिक्षकाने सांगितले होते शरीर के जलना का इलाज मिलेगा मगर मन के जलन का क्या करोगे. तशी अवस्था विरोधकांची झाली आहे.

'देशातल्या विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि मी मिळून भारताचे प्रतिनिधित्व केले. देशात जी गुंतवणूक होणार आहे त्यामुळे तब्बल 16 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. 98 टक्के गुंतवणूक ही थेट परदेशी गुंतवणुकीत (एफडीए) च्या माध्यातून होत आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा येथे देखील मोठी गुंतवणूक झाली आहे. पण मला आनंद आहे सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे.', असे फडणवीस म्हणाले.

माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गेल्यावर्षी चांगली सुरवात केली होती. त्यांनी गेल्यावेळी जे करार केले होते ते देखील आपण मार्गी लावले आहेत. करार करण्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहेत. आणि 60 एमओयू (MOU) केले आहेत. देशातमध्ये एमओयू झाले असताना गुंतवणुकीचे प्रमाण 40 टक्के आहे पण हेच प्रमाणात महाराष्ट्रात 65 टक्के आहे.

भारतातील कंपन्या दावोसमध्ये का?

दावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्कींगचे केंद्र आहे. येथे जगभरातील सीईओ येत असतात. भारतीय कंपन्यांची देखील इच्छा असते की त्यांनी येथे यावे. कारण त्यांचे जगभरातील गुंतवणुकदार, प्रमुख लोक हे सगळे येथे येऊ शकतात. सगळ्या प्रमुख लोकांच्या उपस्थितीत करार होतोय. तुमच्यासोबत चर्चा होते त्यामुळे ते दावोसमध्ये येतात, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT