Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात उद्या मोठा धमाका; नाराज छगन भुजबळ घेणार अमित शाहांची भेट ?

Political News : गेल्या काही दिवसपासून नाराज असलेले भुजबळ राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
Chhagan Bhujbal & Amit Shah
Chhagan Bhujbal & Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी शक्यता होती. मात्र, त्यांना मंत्रिपद देण्यात न आल्याने ते नाराज होते. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पहिल्याच बैठकीस माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती.

गेल्या काही दिवसापासून नर्ज असलेलया भुजबळांकडून 'वेट अँड वॉच'चीच भूमिका घेतली जात होती. शिर्डीतील अधिवेशनाला ते उपस्थित होते. मात्र, त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. त्यातच आता गेल्या काही दिवसपासून नाराज असलेले भुजबळ राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात अमित शाह पूजा करणार आहेत. येथील दर्शनानंतर शाह हे मालेगावकडे रवाना होणार आहेत. मालेगावात अमित शाहांच्या उपस्थितीत सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेत ते मार्गदर्शन करणार आहेत.

Chhagan Bhujbal & Amit Shah
Balasaheb Thackeray : बाळासाहेबांनी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी राज ऐवजी तेव्हा उद्धव ठाकरेंचीच का केली निवड, नेमकं काय ठरलं होतं तेव्हा?

केंद्रीय मंत्री शाह शुक्रवारी महाराष्ट्रात येत आहेत. त्यांची मालेगाव येथे सभा होणार असून यावेळी शाह यांची छगन भुजबळ हे भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीमध्ये भाजप (BJP) प्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याचे समजते. त्यामुळे यावेळी चर्चेत पुढील रणनीती ठरणार आहे. त्यामुळे लवकरच भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असे संकेत मिळत आहेत.

Chhagan Bhujbal & Amit Shah
Rohit Pawar Politics: रोहित पवार यांचा देवाभाऊंना चिमटा, कंपन्या शेजारी आणि करार दावोसला?

या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत सहकार क्षेत्रासाठी शाह काय घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chhagan Bhujbal & Amit Shah
Congress News : मोठी बातमी: महाराष्ट्रात काँँग्रेसचं 'मराठा' कार्ड..! पटोलेंनंतरचा प्रदेशाध्यक्षपदाचा चेहरा ठरला? लवकरच घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com