Devendra Fadnavis News Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीसांनी सांगितली राज्यातील महायुतीच्या पराभवाची कारणे

Lok Sabha Results Bjp Politics News : लोकसभा निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील महायुतीच्या पराभवाची कारणे सांगितली.

Sachin Waghmare

Lok Sabha Results : गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जवळपास समान मते मिळाली आहेत. मात्र ते प्रमाण काहीसे कमी असल्याचा फटका यावेळेस बसला. पण जनतेने नाकारले नाही. या निवडणुकीत काही गोष्टीचा महाविकास आघाडीला निश्चित फायदा झाला. शेतकऱ्यांचा प्रश्नाचा फटका बसला. कापूस, कांदा व सोयाबीन दराचा परिणाम जाणवला. संविधान बदलणे, मराठा आरक्षण या मुद्याचा परिणाम झाला असल्याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली.

लोकसभा निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील महायुतीच्या पराभवाची कारणे सांगितली. राज्यातील जनतेने दिलेला जनादेश मान्य करून पुढील काळात काम करत राहणार आहोत.

देशभरातील कार्यकर्त्याचे व पीएम नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल अभिनंदन करतो. त्यांनी सलग तीनवेळा निवडून येत विक्रमी कामगिरी केली आहे. एनडीएला जनतेने मोठी पसंती दिली आहे.

देशातील या निवडणुकीत जनतेनी मोठा कौल दिला आहे. त्याबद्दल जनतेचे आभार मानतो. देशात इंडीया आघाडीच्या तुलनेत भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजप देशात मोठा पक्ष राहीला आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात महायुतीला यश मिळाले पण माविआच्या तीन पक्षाने एकत्रित काम केले. आमच्या विरोधात काम करताना संविधान बदलणार याचा प्रचार केला त्याचा फटका बसला असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्यातील या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीला 43.91 टक्के तर महायुतीला 43.60टक्के मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख मते मिळाली तर महायुतीला 2 कोटी 48 लाख मते मिळाली. आघाडीला केवळ दोन लाख मते जास्त मिळाली. मात्र त्यांच्या त्यामुळे जागा वाढल्या असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईत महाविकास आघाडीला 4 व महायुतीला 2 जागा मिळाल्या तर महायुतीला 24 लाख तर माविआला 26 लाख मते मिळाली. राज्यात आठ जागा केवळ 4 टक्के पेक्षा कमी मताने हरलो आहोत, ही निवडणूक घासून झाली. त्याचा फटका मात्र महायुतीला बसला असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT