Madha Lok Sabha Election Result 2024: निंबाळकरांच्या पराभवाचा फटका गोरेंना बसणार? माण-खटावमधील गणिते बदलणार...

Madha Election Result 2024: माणमध्ये जरी तुतारीला मताधिक्य मिळाले नसले तरी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या विजयामुळे गुलालात न्हाऊन निघण्याची संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळाली आहे.
Madha Lok Sabha election result 2024:
Madha Lok Sabha election result 2024:Sarkarnama

Rupesh Kadam

Madha Election News: माढा लोकसभा मतदारसंघात महाविकासच्या तुतारीचा निनाद घुमत असताना माण विधानसभा मतदारसंघात मात्र,महायुतीच्या कमळाचा बोलबाला राहिला. आमदार जयकुमार गोरे यांनी आपले मित्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांना विजयी करण्यासाठी आखलेले गणित माणमध्ये जुळले पण, माढ्यात मात्र फसल्याचे चित्र आहे.

माढा मतदारसंघाच्या (Madha Lok Sabha 2024) निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या तुतारीने आघाडी घेतली व ती फेरीनिहाय वाढवत नेली. मात्र, त्याचवेळी माण विधानसभा मतदारसंघात वेगळे चित्र दिसून आले.

या मतदारसंघाने पहिल्या फेरीपासून कमळाची आघाडी वाढवत नेली. माणमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी घेतलेले कष्ट, केलेल्या सूक्ष्म नियोजनाचा परिपाक मतमोजणीत दिसून आला.

माण मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना चांगले मताधिक्य मिळाले. मात्र, त्यांना अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने पहिल्यांदाच त्यांचे गणित फसलेले दिसून आले. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रभाकर देशमुख, शेखर गोरे, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, अभयसिंह जगताप, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे अशी मोठी फळी कार्यरत होती.

या सर्वांनी नेटाने तुतारीचा प्रचार केला. मात्र, शेवटच्या टप्प्यात मोहिते-पाटील यांच्याकडून आर्थिक रसद न मिळाल्यामुळे हे सर्वजण मतदारांच्या भरवशावर विसंबून राहिले. याचा परिणाम मतदानावर झालेला दिसून आला.

अपेक्षित मतदान तुतारीला मिळाले नाही. माणमध्ये जरी तुतारीला मताधिक्य मिळाले नसले तरी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या विजयामुळे गुलालात न्हाऊन निघण्याची संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळाली आहे.

Madha Lok Sabha election result 2024:
Satara loksabha election result 2024 बाळासाहेब पाटलांनी शशिकांत शिंदेंचा केला 'गेम'; उत्तर कराडने दिला दगा

विधानसभेसाठी धोक्याची घंटा?

माण मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे यांचे गावोगावी असलेले नेटवर्क रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना तालुक्यातून मताधिक्य देण्यास उपयोगी ठरले. माणमध्ये तुतारीला मताधिक्य मिळाले नसले तरी हा विजय महाविकास आघाडीला बळ देणारा ठरणार आहे.

माण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांच्या फुटीचा तितकासा परिणाम दिसून आला नाही. या निकालामुळे विधानसभा निवडणुकीत चुरस वाढली असून, आजचा निकाल आमदार जयकुमार गोरे यांच्यासाठी संभाव्य धोक्याची घंटा ठरू शकतो.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com