DCM Devendra Fadnavis  Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis on Elective Merit: ...अन् फडणवीसांनी सांगितलं 'इलेक्टिव्ह मेरिट' म्हणजे नेमकं काय असतं?

Devendra Fadnavis live marathi : जाणून घ्या, भाजपमध्ये कशाप्रकारे उमेदवारांची निवड निश्चित केली जाते अन् फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Mayur Ratnaparkhe

Devendra Fadnavis interview Sarkarnama : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यामुळे आता प्रत्येक मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता विरोधी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी डावपेच आखणे सुरू झाले आहे. दरम्यान, अनेक मतदारसंघात अद्यापही बंडखोर कायम असल्याने त्यांचेही आव्हान पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर आहेच.

एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरू असताना, दुसरीकडे भाजपने अनेक मतदारसंघात उमेदवाराच चेहरा बदलल्याचे दिसून आल्याने, कोणत्या निकषावर हा निर्णय घेतला गेला, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. ज्यावर भाजपकडून(BJP) विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कायमच इलेक्टिव्ह मेरिटवर उमेदवार निवडला गेला असंच सांगितलं जातं. मात्र हे इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे नेमकी काय भानगड आहे, हे अद्याप पर्यंत बहुतांश जणांना समजायचं नाही. अखेर आज साम मराठीने घेतलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या 'इलेक्टिव्ह मेरिट' म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, 'एक आपल्याला राजकीय कार्यकर्ते म्हणून, एक जमिनीवरचा फील असतो. त्या त्या मतदारसंघात पूर्वीच्या काळात लोकांनी कशा पद्धतीने मतदान केलं आहे, हे आपल्याला माहिती असतं. विविध समूह हे पॉवर डायनामिक्समध्ये कसं वागतात? कठुली समूह एकत्रित येतात, कुठली येत नाहीत.अशा सगळ्या ज्या काय पॉलिटकल अर्थमॅटिक्स संबंधित गोष्टी असतात आणि पॉलिटकल केमिस्ट्रीच्या गोष्टी असतात, या दोन्ही गोष्टी जिथे सर्वाधिक असतं. त्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो.'

तसेच 'काही खासगी एजन्सींचे सर्वे देखील आमच्याकडे असतात, आमच्या कार्यकर्त्यांचा एक क्वालिटेटीव्ह सर्वे आम्ही करतो. जे त्या मतदारसंघातील प्रभावशाली असतात, त्यांचा एक सर्वे आम्ही करतो आणि पूर्वीच्या काळात तो मतदारसंघ कशाप्रकारे मतदान करतोय, याचं एकप्रकारे परीक्षण आम्ही करतो.' असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.

याशिवाय 'या सगळ्या आधारावर आम्ही एक निर्णय घेत असतो, की इलेक्टिव्ह मेरीट कुणाला आहे. अर्थात शंभर टक्के वेळा आम्हीच योग्य ठरतो असं नाही. कधीकधी आमचे अंदाज सपशेल चूक ठरतात. पण बहुतांशवेळी ते योग्य देखील ठरतात.पैशांच्या आधारावर निवडणुका जिंकता येतात, या मताचा मी नाही. पैशांचा आधारावर एखादा व्यक्ती थोडा गोंधळ करू शकतो, थोडं अधिक बळ दखवू शकतो. पण निवडणूक जिंकण्यासाठी अनेक कारणं असतात. त्या विविध कारणांचं जेव्हा एकत्रिकरण जेव्हा होतं, तेव्हाच निवडणूक जिंकता येते.' असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT