Madhurima Raje Chhatrapati News : कोल्हापुरच्या 'आखाड्यात' उतरण्यापूर्वीच काँग्रेस चितपट; मधुरीमाराजेंची शेवटच्या क्षणी माघार!

Kolhapur MVA News : सतेज पाटलांनी शाहू महाराज छत्रपतींना बोलून दाखली उघडपणे नाराजी; महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हं
Madhurima Raje Chhatrapati
Madhurima Raje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur North Assembly Constituency and Congress : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याआधीच काँग्रेस चितपट झाली आहे. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी माघार घेत काँग्रेसला धक्का दिला आहे.

निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापुरात मतदानादिवशी 'ईव्हीएम'वर काँग्रेसचा हात नसणार आहे. शेवटच्या क्षणात नाट्यमय घडामोडी घडत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांची मनधरणी करण्यास अपयश आल्याने मधुरिमा राजे यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या अर्ज माघारीची घोषणा शाहू महाराज छत्रपती यांनी केली आहे.

काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये मधुरिमा राजे छत्रपती या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यापूर्वी काँग्रेसकडून(Congress) राजेश लाटकर या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात आली होती. मात्र काँग्रेसकडून होणारा अंतर्गत विरोध पाहून ऐनवेळी राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या सून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली होती.

Madhurima Raje Chhatrapati
Kolhapur Election : महायुतीचा कोल्हापुरातून तर ठाकरेसेनेचा राधानगरीतून प्रचाराचा नारळ फुटणार

राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरल्याने काँग्रेस समोरील अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे लाटकर यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू होते. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी लाटकर यांचे मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. सकाळी ते लाटकर यांची माघार घेण्यासाठी समजूत काढण्यासाठी गेले असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तत्पूर्वी काल खासदार शाहू महाराज छत्रपती, मधुरीमा राजे छत्रपती आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती राजेश लाटकर यांना भेटून विनंती केली होती. मात्र त्याला देखील अपयश आले.

आज सकाळपासून राजेश लाटकर हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या होत्या. शेवटच्या क्षणापर्यंत राजेश लाटकर उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी होती. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी केवळ दहा मिनिटांचा अवघी शिल्लक असताना काँग्रेस उमेदवार मधूरीला राजे छत्रपती जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत उमेदवारी अर्ज माघार घेतला. त्या संदर्भात घोषणा शाहू महाराज छत्रपती(Shahu Maharaj Chhatrapati) यांनी केली. या संपूर्ण घडामोडीमुळे काँग्रेसला धक्का मिळाला आहे. निवडणुकीच्या पटलावर येण्यापूर्वीच काँग्रेसचा हा पराभव मानला जातो.

Madhurima Raje Chhatrapati
Rajesh Latkar : कोल्हापुरात लाटकरांनी काँग्रेसचं टेन्शन वाढवलं! सकाळपासून नॉट रिचेबल

सतेज पाटील भडकले... -

मधूरीमाराजे छत्रपती हे माघार घेणार असल्याचे समजताच काँग्रेस नेते सतेज पाटील(Satej Patil) यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यांनी मालोजीराजे छत्रपती यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मालोजी अर्ज माघार घेऊ नका, अशी विनंती केली. तुम्ही पूर्णपणे माझी फसवणूक केली आहात. आधीच निर्णय घ्यायला हवा होता.

आमची काही अडचण नव्हती. मला तोंड कशी पाडायची काय गरज होती. असे खासदार शाहू छत्रपती यांना सतेज पाटील म्हणाले. मात्र मधूरीमाराजे यांनी माघार घेत या प्रकरणावर पडदा टाकला. मात्र त्यांनी माघार घेतात सतेज पाटील संतापाने बाहेर येत शाहू महाराज छत्रपती यांच्या निकटवर्ती यांना झापले. दम नव्हता तर उभारायचे नव्हते ना मग. मी पण दाखवले असती माझी ताकद. अशा शब्दात कार्यकर्त्यांना पाटील यांनी सुनावले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com