Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडली. त्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले. राज्यातील जनेतेने महायुतीला पुन्हा एकदा एक हाती सत्ता सोपवली. त्यानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार दहा ते 12 दिवस रखडला होता. त्यानंतर 15 डिसेंबरला नागपूरमध्ये 39 मंत्र्यांनी शपथ घेतली.
त्यानंतर खातेवाटपावरून महायुतीमधील घटक पक्षात जोरदार रस्सीखेच पहावयास मिळाली. त्यानंतर 21 डिसेंबरला खातेवाटप करण्यात आले. मात्र कुणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यायचं? हे निश्चित करण्यात आले नव्हते. अखेर पालकमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दावोसला रवाना होण्याआधी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.
यामध्ये सर्वात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तर गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे ठाण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी दोन उपमुख्यमंत्र्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम होता. कोणाला कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी मिळणार? याची सर्वत्र चर्चा सुरु होती. मात्र, अखेर पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दोन जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडे नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपद असणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दोन महत्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्रीपद असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.