Beed Police : संतोष देशमुखांच्या हत्येनं हादरलेल्या बीडमध्ये पोलिस अधिक्षकांनी घेतले 'हे' 3 मोठे निर्णय

Navneet Kanwat Big Decision : दिवसेंदिवस बीडमधील वाढत्या गुन्हेगारीनं तेथील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असल्याचा आरोपही केला जात आहे.अशातच आता बीड पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 3 मोठे निर्णय घेतले आहे.
Beed Police  .jpg
Beed Police .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीडमधील मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण राज्य हादरलं. या हत्येप्रकरणी आत्तापर्यंत वाल्मिक कराडसह एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे हा एक आरोपी अद्यापही फरार आहे. बीड पोलिस, सीआयडी, एसआयटी अशा विविध यंत्रणांकडून या हत्येप्रकरणाचा तपास सुरू आहे. दिवसेंदिवस बीडमधील वाढत्या गुन्हेगारीनं तेथील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असल्याचा आरोपही केला जात आहे.अशातच आता बीड (Beed) पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 3 मोठे निर्णय घेतले आहे.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची धग मंत्रालयासह संसदेतही पोहचली. अपहरण, कोंडी,यांसारख्या घटनांमुळे बीडचा बिहार झाल्याची टीकाही केली जात आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा ठपका ठेवण्यात आला. या आरोपांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करत त्या पदावर आता छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस (Police) उपआयुक्त धडाकेबाज कारवाया,शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी नवनीत काँवत यांची नियुक्ती केली आहे.

नवनीत काँवत यांनी बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस पावले उचलली असतानात पोलिस प्रशासनातही शिस्तीचा बडगा उगारला आहे. गेल्या दीडमहिन्यांहून अधिक काळापासून बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा आरक्षणावरून आधीच संघर्ष पेटलेला असतानाच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या वादाला आणखीच धार आली. त्यामुळे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची दाट शक्यता आहे.

Beed Police  .jpg
Beed Crime : बीडमधील गुन्हेगारीचा कहर! महिला सरपंचाला देखील सोडलं नाही, खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

याचदरम्यान,आता धगधगणाऱ्या बीडमध्ये पोलिस अधिक्षक काँवत यांनी जिल्ह्यात जातीयवाद कमी करण्यासाठी पोलिसांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. हा पोलिसांसाठी मोठा इशाराही मानला जात आहे.

बीड पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांशी पोलिस ठाण्यात किंवा ड्युटीवर असताना संवाद साधताना आडनावाऐवजी थेट नावाने हाक मारावी. तसेच ड्युटीवर असताना रील्स काढू नये, तसेच ते सोशल मीडियावर शेअरही करु नये. अन्यथा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Beed Police  .jpg
CIDCO : संजय शिरसाटांना अध्यक्षपदावरून हटवताच 'सिडको'चा अर्जदारांना मोठा धक्का, 26,000 घरांच्या किंमती 'जैसे थे'

त्याचबरोबर पोलिस ठाण्यात लाचप्रकरणी एसीबीची कारवाई झाली,तर संबंधित पोलिस ठाणेप्रमुखाची थेट नियंत्रण कक्षात ट्रान्सफर करण्यात येईल,यांसारख्या सूचना देत थेट पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वर्गालाच मोठा इशारा दिला आहे. या कडक निर्णयाची जोरदार चर्चा आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीडमधील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील 6 आरोपींच्या कोठडीची मुदत शनिवारी (ता.18) संपली. या आरोपींच्या जामीन अर्जावर आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. त्यानुसार आता ती 22 जानेवारी रोजी होणार आहे. तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याचा निर्णय न्यायमूर्ती सुरेखा पाटील यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com