Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Video Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस भाजपचे नवे अध्यक्ष? आरएसएसचा ग्रीन सिग्नल

Roshan More

Devendra Fadnavis News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यग्र असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे आले आहे. या विषयी वृत्त साम टीव्हीने दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील फडणवीस यांच्या नावाला ग्रीन सिग्नल असल्याच्या चर्चा आहेत.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. आधी या पदासाठी विनोद तावडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांचे नाव मागे पडून आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. मात्र, अजून नवीन अध्यक्षांची निवड झाली नसल्याने अध्यक्षपदाचा कार्यभार जे पी नड्डा यांच्याकडेच आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर नोव्हेंबर महिन्यात भाजपला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी पार पाडली आहे. त्यांच्या काळात पक्ष संघटन मजबूत झाले आहे. लोकसभेनंतर पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करत मंत्रि‍पदातून मुक्त करण्याची मागणी फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांचा पक्ष संघटनेतील अनुभव पाहता त्यांना भाजप अध्यक्षपदी वर्णी लागू शकते, अशा चर्चा आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT