Vidhansabha Election FlashBack : 288 जागा, 125 पक्ष, 1397 अपक्ष; पण 109 पक्षांच्या हाती भोपळा अन्...

Maharashtra Political News : 2019 च्या निवडणुकीत काही पक्षांच्या जागा घटल्या तर काहींच्या वाढल्या. 2014 च्या निवडणूक निकालाशी ताडून पाहिल्यास भाजपच्या 17, शिवसेनेच्या 07 आणि शेकापच्या 02 जागा घटल्या मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या.
Legislative Council Election
Legislative Council Electionsarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2019 News : 2019 च्या निवडणुकीचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 125 पक्ष आणि 1397 अपक्ष विधानसभेच्या 288 जागा मिळवण्यासाठी तुटून पडले. त्यातल्या 15 पक्षांच्या हाती काही ना काही तरी गवसलं पण उरलेल्या 109 पक्षांच्या हाती भोपळा लागला. विशेष म्हणजे 13 अपक्ष उमेदवार आमदार बनले.

2014 ची विधानसभा स्वतंत्र लढल्यानंतर 2019 ला शिवसेना-भाजपवाले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवाले पुन्हा एकदा गळ्यात गळे घालत एकत्र लढले मात्र एकत्र लढण्याचे दुष्परिणाम पुढं काय होतील हे कुणाच्या गावीही नव्हते. भाजप-शिवसेनेनं 164-124 या फॉर्म्युल्यानुसार जागा वाटून घेतल्या तर तिकडं काँग्रेस-राष्ट्रवादीनं 147-121 या फॉर्म्युल्यावर निवडणूक लढवली. थोडे-थोडके नव्हे 1397 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आणि 288 जागा मिळवण्यासाठी 125 पक्ष, 1397 अपक्ष यांच्यात सुरू झाला रणसंग्राम विधानसभेचा...

तितक्यात युती, आघाडीचा सत्तापट उधळून लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री झाली. 'वंचित' तब्बल 236 जणांची पलटण घेऊन मैदानात उतरली. अशावेळी 'मनसे' तरी कशी मागं राहील? 101 मनसैनिकांची फौज आखाड्यात उतरली. तिकडं शेकडोहून लहान-सहान पक्ष देखील आपली तलवार परजून तयार होतेच मात्र अपक्ष उमेदवारांनी तर कहरच केला.

थोडे-थोडके नव्हे 1397 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आणि 288 जागा मिळवण्यासाठी 125 पक्ष, 1397 अपक्ष यांच्यात रणसंग्राम विधानसभेचा सुरू झाला.

युतीची सरशी, आघाडी तोंडघशी

अखेर निकालाचा दिवस उजाडला आणि कोण किती पाण्यात आहे याचा फैसलाही झाला. शिवसेना (Shivsena) -भाजप युतीला 161 तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 98 जागा मिळाल्या. 105 जागा मिळवत भाजप संपूर्ण महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष ठरला. शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या.

'वंचित'ची पलटण तर जागेवरच ढेर झाली पण तिनं लक्षणीय म्हणजे 25 लाख 18 हजार 747 इतकी मतं मिळवली. 'मनसे'चा एक शिलेदार वगळता उर्वरित फौजेनं मान टाकली. 'वंचित'च्या हाती भोपळा लागला तर 'मनसे'चा एकमेव शिलेदार राजू पाटील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेवर गेला.

Legislative Council Election
JDU and Jharkhand Assembly Election : नितीश कुमारांच्या 'JDU'ने घेतला झारखंड विधानसभा लढवण्याचा निर्णय; भाजपसोबत मैदानात उतरणार!

लहान- सहान पक्षांचे किती उमेदवार निवडून आले?

बहुजन विकास आघाडी - 03 विजयी- लढवलेल्या जागा - 31

एआयएमआयएम - 02 विजयी - लढवलेल्या जागा - 44

प्रहार जनशक्ती पक्ष - 02 विजयी - लढवलेल्या जागा - 26

समाजवादी पक्ष - 02 विजयी - लढवलेल्या जागा - 07

शेतकरी कामगार पक्ष - 01 विजयी - लढवलेल्या जागा - 24

स्वाभिमानी पक्ष - 01 विजयी - लढवलेल्या जागा - 05

माकप - 01 विजयी - लढवलेल्या जागा - 08

जन सुराज्य शक्ती पक्ष - 01 विजयी - लढवलेल्या जागा - 04

क्रांतिकारी शेतकरी पक्ष - 01 विजयी - लढवलेल्या जागा - 01

राष्ट्रीय समाज पक्ष - 01 विजयी - लढवलेल्या जागा - 01

'या' कुणालाही मिळालं नाही झुकतं माप!

याशिवाय इतरही काही लहान-मोठे पक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यात प्रामुख्यानं आम आदमी पक्ष (आप), बहुजन समाज पक्ष (बसप), जनता दल (सं), भाकप आणि असे बरेच... पण यातल्या एकाही पक्षाची डाळ काही शिजली नाही. 'बसप'नं तर स्वबळावर महाराष्ट्रात इतर कोणत्याही पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे तब्बल 263 जागा लढवल्या पण त्याला नेहमीप्रमाणं खातंही उघडता आलं नाही.

1397 अपक्ष उभे राहिले, 13 जण निवडून आले

अपक्ष उमेदवारांनी मात्र कमाल केली. 2014 साली जिथं 06 अपक्ष उमेदवार निवडून आले होते तिथं 2019 च्या निवडणुकीत त्यांची संख्या दुपटीहून एकनं वाढली. 1397 पैकी 13 अपक्ष उमेदवार आमदार बनले.

Legislative Council Election
Mahayuti News : भाजप, शिंदे गटाची धडधड वाढली; महायुतीकडे अजितदादांनी मागितल्या तब्बल इतक्या जागा

भाजप-सेनेच्या जागा घटल्या, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाढल्या

2019 च्या निवडणुकीत काही पक्षांच्या जागा घटल्या तर काहींच्या वाढल्या. 2014 च्या निवडणूक निकालाशी ताडून पाहिल्यास भाजपच्या 17, शिवसेनेच्या 07 आणि शेकापच्या 02 जागा घटल्या मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या. राष्ट्रवादीच्या 13, काँग्रेसच्या 02 तर समाजवादी पक्षाची 01 जागा वाढली. तिकडं 2014 ला भोपळा हाती आलेल्या स्वाभिमानी आणि जनसुराज्य शक्ती या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत मात्र प्रत्येकी 01 जागा मिळवत खातं उघडलं.

...अन् भाजप विरोधी बाकांवर जाऊन बसला!

सत्ता स्थापनेसाठी लागणारी 145 ची 'मॅजिक फिगर' गाठल्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचं सरकार येणार असं दिसू लागलं असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात 'न भूतो न भविष्यति' असा 'प्रयोग' घडून आला आणि सत्तेची चव चाखण्यास आतुर झालेल्या भाजपची स्थिती 'हात आया पर मुंह ना लगा,' अशी झाली.

इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक जागा मिळवणारा भाजप अखेर विरोधी बाकांवर जाऊन बसला तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी बनलेल्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनला.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या महाविकास आघाडी सरकारचे अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

Legislative Council Election
BJP Politics In Odisha : ओडिशामध्ये सुरू झाला 'खेला'? ; भाजपचा नवा गड राज्यसभेत सेट करणार नंबर गेम!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com